Shri Gurucharitra Chapter 44( EnglishTransliteration with Marathi Ovi and meaning )Dwijakushatpriharo
![]() |
| Image From -Google |
Introduction
The Shri Guru Charitra is not merely a biographical account of Shri Narasimha Saraswati Swami Maharaj; it is a spiritual lighthouse for millions. Chapter 44 holds a unique place in this sacred text as it beautifully illustrates the intersection of divine grace and human faith.
This chapter narrates the profound story of a Brahmin named Nandi, who, burdened by the agony of leprosy, finds ultimate refuge at the feet of Shri Guru. It is a testament to the fact that when all worldly doors close and even deities test one's patience, the Sadguru remains the final sanctuary. Through this translation and compilation, the aim is to bring the reader closer to the core teachings of surrender, the perils of doubt, and the transformative power of the Guru's 'Vibhuti'.
Note: This is an English translation and transliteration of the original 16th-century classic by Saraswati Gangadhar, meticulously prepared for global devotees of Lord Dattatreya by Mantra Stotra Jyoti With Marathi Ovi Meaning & EnglishTransliteration & Ovi
Shree Ganesha Namah: Shree Saraswatya Namah:. Shree Kul Devtay Namah: Shree Padshrivallabhai Namah: Shree Nrisimha Saraswatyai Namah: Shree Gurubhyo Namah:
Ovi 1: नामधारक म्हणे सिद्धमुनि । श्रीगुरुचरित्र तुम्ही देखिलें नयनीं । तुमचें भाग्य काय वानूं वदनीं । परब्रह्म देखिलें असे ॥ १ ॥
Transliteration: Nāmadhāraka mhaṇē siddhamuni | Śrīgūrucaritra tumhī dēkhilēṁ nayanīṁ | Tumacēṁ bhāgya kāya vānūṁ vadanīṁ | Parabrahma dēkhilēṁ asē || 1 ||
Meaning: Namdharak said to Siddha Muni, "O sage, you have witnessed the life of Shri Guru with your own eyes. How can I praise your fortune? You have seen the Supreme Brahman."
अर्थ: नामधारक सिद्धमुनींना म्हणाला, "हे सिद्धमुनी, तुम्ही श्रीगुरूंचे चरित्र प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिले आहे. तुमचे भाग्य किती मोठे आहे, की तुम्ही साक्षात परब्रह्माचे दर्शन घेतले आहे."
Ovi 2: तुमचेनि प्रसादेंसीं । अमृतपान झालें आम्हांसी । आतां कष्ट आम्हां कायसी । सकळाभीष्ट लाधलों ॥ २ ॥
Transliteration: Tumacēni prasādēnsīṁ | Amrtapāna jhālēṁ āmhānsī | Ātāṁ kaṣṭa āmhā kāyasī | Sakaḷābhīṣṭa lādhalōṁ || 2 ||
Meaning: "By your grace, I have tasted the nectar of Guru Charitra. Now I have no more troubles; all my desires have been fulfilled."
अर्थ: "तुमच्या कृपेमुळे मला या गुरुचरित्ररूपी अमृताचे पान करायला मिळत आहे. आता मला कसलेही कष्ट उरले नाहीत, माझ्या सर्व इच्छा पूर्ण झाल्या आहेत."
Ovi 3: तुम्ही भेटलेति मज तारका । दैन्य गेलें सकळ दुःख । सर्वाभीष्ट लाधलों सुख । गुरुचरित्र ऐकतां ॥ ३ ॥
Transliteration: Tumhī bhēṭalēti maja tārakā | Dainya gēlēṁ sakaḷa duḥkha | Sarvābhīṣṭa lādhalōṁ sukha | Gurucharitra aikatāṁ || 3 ||
Meaning: "You met me as a savior; all my poverty and sorrows have vanished. I have attained supreme happiness by listening to Guru Charitra."
अर्थ: "तुम्ही मला तारणाऱ्या गुरूसमान भेटलात, माझे सर्व दुःख आणि दारिद्र्य संपले आहे. हे गुरुचरित्र ऐकून मला परम सुख मिळत आहे."
Ovi 4: मागें कथानक सांगितलें । श्रीगुरु संगमीं राहिले । पुढें काय अपूर्व वर्तलें । निरोपावें दातारा ॥ ४ ॥
Transliteration: Māgēṁ kathānaka sāṅgitalē | Śrīgūru saṅgamīṁ rāhilē | Puḍhēṁ kāya apūrva vartalē | Nirōpāvēṁ dātārā || 4 ||
Meaning: "In the previous story, you said Shri Guru stayed at the Sangam. O giver, please tell me what miraculous event happened next."
अर्थ: "मागील कथेत आपण सांगितले की श्रीगुरु संगमावर राहिले होते. त्यानंतर कोणती अद्भूत घटना घडली, ते मला सांगा."
Ovi 5: सिद्ध सांगे नामधारकासी । ऐक वत्सा विस्तारेंसीं । विचित्र झालें येरे दिवसीं । एकचित्तें परियेसा ॥ ५ ॥
Transliteration: Siddha sāṅgē nāmadhārakāsī | Aika vatsā vistārēnsī | Vicitra jhālēṁ yērē divasī | Ēkacittēṁ pariyēsā || 5 ||
Meaning: Siddha said to Namdharak, "Listen carefully, my child. A very strange and wonderful event occurred on that day; listen with a focused mind."
अर्थ: सिद्धमुनी म्हणाले, "हे वत्सा ऐक, त्यानंतर एक अत्यंत विचित्र आणि नवलपूर्ण घटना घडली, ती तू एकाग्रतेने ऐक."
Ovi 6: ‘नंदी’ नाम एक ब्राह्मण । सर्वांगीं कुष्ट श्वेतवर्ण । तुळजापुरा जाऊन । वर्षें तीन आराधिलें ॥ ६ ॥
Transliteration: ‘Nandī’ nāma ēka brāhmaṇa | Sarvāṅgīṁ kuṣṭa śvētavarṇa | Tuḷajāpurā jāūna | Varṣēṁ tīna ārādhilē || 6 ||
Meaning: A Brahmin named Nandi had white leprosy over his entire body. He went to Tuljapur and worshipped the Goddess for three years.
अर्थ: 'नंदी' नावाचा एक ब्राह्मण होता, ज्याला सर्व अंगावर पांढरे कुष्ठ (कोड) होते. त्याने ते बरे व्हावे म्हणून तुळजापूरला जाऊन तीन वर्षे देवीची आराधना केली.
Ovi 7: तीन संवत्सर उपवास । द्विज कष्टला बहुवस । निरोप झाला सायासें । चंदलापरमेश्वरीजवळी जाणें ॥ ७ ॥
Transliteration: Tīna saṁvatsara upavāsa | Dvija kaṣṭalā bahuvasa | Nirōpa jhālā sāyāsēṁ | Candalāparamēśvarījavaḷī jāṇēṁ || 7 ||
Meaning: For three years he fasted and suffered greatly. Finally, he received a message to go to Chandala Parameshwari.
अर्थ: तीन वर्षे उपवास करून तो खूप कष्टला. शेवटी देवीने त्याला निरोप दिला की, तू चंदलापरमेश्वरीकडे (सन्नती क्षेत्र) जा.
Ovi 8: जगदंबेचा निरोप घेऊनि । आला चंदलापरमेश्वरीस्थानीं । मास सात पुरश्चरणीं । पुनरपि केले उपवास ॥ ८ ॥
Transliteration: Jagadambēcā nirōpa ghēūni | Ālā candalāparamēśvarīsthānīṁ | Māsa sāta puraścaraṇīṁ | Punarapi kēlē upavāsa || 8 ||
Meaning: Taking the Goddess's message, he came to the place of Chandala Parameshwari and fasted again for seven months during a ritual.
अर्थ: तुळजाभवानीचा निरोप घेऊन तो सन्नतीला आला आणि तिथे त्याने पुन्हा सात महिने कडक उपवास करून पुरश्चरण केले.
Ovi 9: नानापरी कष्टतां । स्वप्न जाहलें अवचिता । तुवां जावें त्वरिता । गाणगग्रामस्थानासी ॥ ९ ॥
Transliteration: Nānāparī kaṣṭatā | Svapna jāhalēṁ avacitā | Tuvā jāvē tvaritā | Gāṇagagrāmasthānāsī || 9 ||
Meaning: After many hardships, he suddenly had a dream telling him to go quickly to Ganagapur.
अर्थ: खूप कष्ट उपसल्यानंतर त्याला अचानक स्वप्न पडले की, "तू त्वरित गाणगापूर या क्षेत्राला जा."
Ovi 10: तेथें असती श्रीगुरु । त्रयमूर्तीचा अवतारु । वेष धरिला असे नरु । तेथें होसील उत्तमांगी ॥ १० ॥
Transliteration: Tēthēṁ asatī śrīgūru | Trayamūrtīcā avatāru | Vēṣa dharilā asē naru | Tēthēṁ hōsīla uttamāṅgī || 10 ||
Meaning: "Shri Guru is there, who is the incarnation of the Trinity. He has taken human form; there you will become healthy."
अर्थ: "तिथे साक्षात त्रैमूर्तींचा अवतार असलेले श्रीगुरु मानवी रूपात राहत आहेत. त्यांच्याकडे गेल्यावर तू व्याधीमुक्त होऊन तुझे शरीर सुंदर होईल."
Ovi 11: ऐसे निरोप त्यासी जाहले । विप्र म्हणे भलें केलें । मास सात कां चुकर केलें । जरी तुझे हातीं नोहेचि ॥ ११ ॥
Transliteration: Aisē nirōpa tyāsī jāhalē | Vipra mhaṇē bhalēṁ kēlē | Māsa sāta kāṁ cukara kēlē | Jarī tujhē hātīṁ nōhēci || 11 ||
Meaning: Upon hearing this, the Brahmin got angry and said, "Why did you waste my seven months if nothing was in your hands?"
अर्थ: असा निरोप मिळाल्यावर तो ब्राह्मण रागावला. तो देवीला म्हणाला, "जर तुझ्या हातात काही नव्हते, तर माझे सात महिने का वाया घालवले?"
Ovi 12: जगन्माता तुळजा भवानी । तिचा निरोप घेऊनि । आलों तुजपाशीं ठाकोनि । तूं दैवत म्हणोनियां ॥ १२ ॥
Transliteration: Jagannmātā tuḷajā bhavānī | Ticā nirōpa ghēūni | Ālōṁ tujapāśīṁ ṭhākōni | Tū daivata mhaṇōniyā || 12 ||
Meaning: "I came to you following Tulja Bhavani's instructions, believing you to be a powerful deity."
अर्थ: "मी तुळजाभवानीचा निरोप घेऊन तुझ्याकडे आलो होतो, कारण तू मोठी देवता आहेस असे मला वाटले होते."
Ovi 13: दैवतपण ठाउकें जाहलें । आम्हांसी निरोप दिधलें । मनुष्यापाशीं जा म्हणितलें । तुझे हातीं नोहेचि कांहीं ॥ १३ ॥
Transliteration: Daivatapaṇa ṭhāukēṁ jāhalē | Āmhānsī nirōpa didhalē | Manuṣyāpāśīṁ jā mhaṇitalē | Tujhē hātīṁ nōhēci kāṁhī || 13 ||
Meaning: "Now I know your godliness. You tell me to go to a human; it means you can do nothing."
अर्थ: "आता तुझे देवपण कळून आले. तू मला एका माणसाकडे (श्रीगुरूंकडे) जायला सांगतेस, याचा अर्थ तुझ्या हातात काहीच नाही."
Ovi 14: तूं जगद्दैवत जगदंबा म्हणविसी । आम्हां मनुष्यापाशीं पाठविसी । नांव जाहलें दैवतपणासी । भाग्य माझें म्हणतसे ॥ १४ ॥
Transliteration: Tū jagaddaivata jagadambā mhaṇavisī | Āmhā manuṣyāpāśīṁ pāṭhavisī | Nāṁva jāhalēṁ daivatapaṇāsī | Bhāgya mājhēṁ mhaṇatasē || 14 ||
Meaning: "You call yourself Jagadamba but send me to a human? It's just my bad luck."
अर्थ: "तू स्वतःला जगदंबा म्हणवतेस आणि मला माणसाकडे पाठवतेस? हे माझेच नशीब वाईट आहे," असे म्हणून तो दुःख करू लागला.
Ovi 15: मनुष्यापाशीं जा म्हणावयासी । लाज नये कैसी तुम्हांसी । ओळख जाहली दैवतपणासी । उपवासी सात महिने ॥ १५ ॥
Transliteration: Manuṣyāpāśīṁ jā mhaṇāvayāsī | Lāja nayē kaisī tumhānsī | Oḷakha jāhalī daivatapaṇāsī | Upavāsī sāta mahinē || 15 ||
Meaning: "Aren't you ashamed to send me to a man? I have realized your divinity after seven months of fasting."
अर्थ: "एका माणसाकडे जा म्हणताना तुला कशी लाज वाटली नाही? तुझे देवपण मला सात महिन्यांच्या उपवासानंतर चांगलेच कळाले आहे."
Ovi 16: पहिलेंचि जरी निरोप देत । इतुके कष्ट आम्हां न होत । दुराशा केली मी परदैवत । म्हणोनि, दुःख करी नानापरी ॥ १६ ॥
Transliteration: Pahilēñci jarī nirōpa dēta | Itukē kaṣṭa āmhā na hōta | Durāśā kēlī mī paradaivata | Mhaṇōni, duḥkha karī nānāparī || 16 ||
Meaning: "If you had told me earlier, I wouldn't have suffered so much. I had high hopes from you," he said, lamenting in many ways.
अर्थ: "जर हेच सांगायचे होते तर आधी का सांगितले नाही? विनाकारण कष्ट दिले," असे म्हणून तो देवीची निर्भत्सना करू लागला.
Ovi 17: ऐसें अनेकपरीनें । दुःख करीतसे तो ब्राह्मण । पुन्हा मागुती पुरश्चरण । करीन म्हणे तो द्विजवर ॥ १७ ॥
Transliteration: Aisē anēkaparīnē | Duḥkha karītasē tō brāhmaṇa | Punhā māgutī puraścaraṇa | Karīna mhaṇē tō dvijavara || 17 ||
Meaning: Lamenting thus, the Brahmin decided to sit in protest (Purashcharan) again.
अर्थ: ऐसें अनेकपरीनें दुःख करीत तो ब्राह्मण पुन्हा धरणे धरून बसेन असे म्हणाला.
Ovi 18: म्हणे मज बरवें होणें । अथवा आपुला प्राण देणें । ऐसें बोलोनि निर्वाणें । विप्र धरणें बैसला ॥ १८ ॥
Transliteration: Mhaṇē maja baravē hōṇē | Athavā āpulā prāṇa dēṇē | Aisē bōlōni nirvāṇē | Vipra dharaṇē baisalā || 18 ||
Meaning: He resolved, "Either cure me or take my life," and sat down determinedly.
अर्थ: "एक तर मला बरे कर किंवा माझे प्राण घे," असा निश्चय करून तो हट्टाला पेटून तिथेच बसला.
Ovi 19: पुनरपि स्वप्न तयासी । तैसेंचि होय परियेसीं । आणिक समस्त भोपियांसी । तेणेंचिपरी स्वप्न होय ॥ १९ ॥
Transliteration: Punarapi svapna tayāsī | Taisēñci hōya pariyēsīṁ | Āṇika samasta bhōpiyānsī | Tēṇēñciparī svapna hōya || 19 ||
Meaning: He had the same dream again, and all the temple priests (Bhopes) had the same dream as well.
अर्थ: त्याला पुन्हा तसेच स्वप्न पडले. इतकेच नाही तर तिथल्या पुजारी (भोपे) मंडळींनाही देवीने स्वप्नात तोच निरोप दिला.
Ovi 20: सकळ भोपे म्हणती तयासी । आजि स्वप्न झालें आम्हांसी । छळण न करीं गा देवीसी । निरोपासरसा जाईं वेगीं ॥ २० ॥
Transliteration: Sakaḷa bhōpē mhaṇatī tayāsī | Āji svapna jhālēṁ āmhānsī | Chaḷaṇa na karīṁ gā dēvīsī | Nirōpāsarasa jāīṁ vēgīṁ || 20 ||
Meaning: All the priests told him, "We too had the dream today. Don't trouble the Goddess, go quickly as instructed."
अर्थ: पुजारी त्याला म्हणाले, "आम्हालाही देवीने स्वप्नात सांगितले आहे. आता देवीची परीक्षा न पाहता तू त्वरित गाणगापूरला निघून जा."
Ovi 21: तूं तरी आतां नव जासी । आम्हां निरोप झाला ऐसी । बाहेर घालूं तुम्हांसी । देवळांत येऊं नेदूं ॥ २१ ॥
Transliteration: Tū tarī ātāṁ nava jāsī | Āmhā nirōpa jhālā aisī | Bāhēra ghālūṁ tumhānsī | Dēvaḷānt yēūṁ nēdūṁ || 21 ||
Meaning: "If you don't go now, we are instructed to throw you out and not let you enter the temple."
अर्थ: "जर तू आता गेला नाहीस, तर आम्ही तुला मंदिराबाहेर काढू आणि पुन्हा येऊ देणार नाही."
Ovi 22: इतुकें जाहलियावरी । पारणें केलें द्विजवरीं । पूजा करी नानापरी । निरोप घेऊनि निघाला ॥ २२ ॥
Transliteration: Itukēṁ jāhaliyāvarī | Pāraṇēṁ kēlē dvijavarīṁ | Pūjā karī nānāparī | Nirōpa ghēūni nighālā || 22 ||
Meaning: After all this, the Brahmin broke his fast, performed various rituals, and left with the message.
अर्थ: शेवटी नाइलाजाने त्या ब्राह्मणाने उपवास सोडला, देवीची पूजा केली आणि तिथून गाणगापूरला निघाला.
Ovi 23: गाणगाग्रामासी आला । मठीं जाऊनि पुसों लागला । भक्तजन सांगती त्याला । संगमीं आहेत गुरुमूर्ति ॥ २३ ॥
Transliteration: Gāṇagagrāmāsī ālā | Maṭhīṁ jāūni pusōṁ lāgalā | Bhakta Jana sāṅgatī tyālā | Saṅgamīṁ āhēta gurūmūrti || 23 ||
Meaning: He reached Ganagapur and asked at the monastery. Devotees told him that Shri Guru was at the Sangam.
अर्थ: गाणगापूरला आल्यावर त्याने मठात विचारपूस केली. भक्तांनी सांगितले की श्रीगुरु सध्या संगमावर आहेत.
Ovi 24: भक्त म्हणती तयासी । श्रीगुरु येतील पारणेसी । काल शिवरात्री-उपवासी । आतां येतील परियेसीं ॥ २४ ॥
Transliteration: Bhakta mhaṇatī tayāsī | Śrīgūru yētīla pāraṇēsī | Kāla śivarātrī-upavāsī | Ātāṁ yētīla pariyēsīṁ || 24 ||
Meaning: Devotees told him, "Shri Guru will come for the meal. Yesterday was Mahashivratri; He will come after His fast."
अर्थ: भक्त म्हणाले, "काल महाशिवरात्र होती, श्रीगुरूंचा उपवास होता. आता ते उपवास सोडण्यासाठी (पारण्यासाठी) मठात येतील."
Ovi 25: इतुकिया अवसरीं । श्रीगुरु आले साक्षात्कारी । ग्रामलोक द्विजातें वारी । राहें दूरी नको सन्मुख ॥ २५ ॥
Transliteration: Itukiyā avasarīṁ | Śrīgūru ālē sākṣātkārī | Grāmalōka dvijātēṁ vārī | Rāhēṁ dūrī nakō sanmukha || 25 ||
Meaning: Just then, Shri Guru appeared. People told the diseased Brahmin to stay away and not stand in front.
अर्थ: तितक्यात श्रीगुरु मठात आले. ब्राह्मणाला कुष्ठरोग असल्यामुळे लोक त्याला बाजूला सारू लागले आणि "गुरूंसमोर येऊ नकोस" असे सांगू लागले.
Ovi 26: श्रीगुरु आले मठांत । द्विज उभा होता चिंतीत । भक्तजन सांगती मात । विप्र एक आला असे ॥ २६ ॥
Transliteration: Śrīgūru ālē maṭhānt | Dvija ubhā hōtā cintīt | Bhaktajana sāṅgatī māta | Vipra ēka ālā asē || 26 ||
Meaning: Shri Guru entered the monastery while the Brahmin stood worried outside. Devotees informed Guru about his arrival.
अर्थ: श्रीगुरु मठात गेल्यावर तो ब्राह्मण चिंतेत बाहेर उभा होता. भक्तांनी श्रीगुरूंना सांगितले की एक ब्राह्मण दर्शनासाठी आला आहे.
Ovi 27: सर्वांगीं असे श्वेत । स्वामिदर्शना आलों म्हणत । श्रीगुरु म्हणती आपण जाणत । संदेहरुपें आला असे ॥ २७ ॥
Transliteration: Sarvāṅgīṁ asē śvēta | Svāmidarśanā ālōṁ mhaṇata | Śrīgūru mhaṇatī āpaṇa jāṇata | Sandēharupēṁ ālā asē || 27 ||
Meaning: "His whole body is white," they said. Shri Guru replied, "I know, he has come with a doubt in his mind."
अर्थ: "त्याचे सर्व अंग पांढरे झाले आहे." श्रीगुरु हसून म्हणाले, "मला माहित आहे, तो मनात शंका घेऊन आला आहे."
Ovi 28: म्हणती बोलावा मठांत । भक्त गेले धांवत । तया द्विजातें पाचारीत । आला विप्र आंगणा ॥ २८ ॥
Transliteration: Mhaṇatī bōlāvā maṭhānt | Bhakta gēlē dhāṁvata | Tayā dvijātēṁ pācārīta | Ālā vipra āṅgaṇā || 28 ||
Meaning: "Call him inside," Guru said. Devotees ran and called the Brahmin into the courtyard.
अर्थ: श्रीगुरूंनी त्याला आत बोलावले. भक्त त्याला बोलवायला गेले आणि तो ब्राह्मण मठाच्या अंगणात आला.
Ovi 29: दुरोनि देखिलें श्रीगुरुसी । नमन करीत लोळे भूमीसी । श्रीगुरु म्हणती तयासी । संदेहरुपें आलासि कां ॥ २९ ॥
Transliteration: Durōni dēkhilēṁ śrīgūrusī | Namana karīta lōḷē bhūmīsī | Śrīgūru mhaṇatī tayāsī | Sandēharupēṁ ālāsī kāṁ || 29 ||
Meaning: Seeing Shri Guru from afar, he prostrated. Shri Guru asked him, "Have you come with doubt in your mind?"
अर्थ: श्रीगुरूंना दुरून पाहताच त्याने साष्टांग नमस्कार केला. श्रीगुरु त्याला म्हणाले, "काय, मनात शंका घेऊन आलास का?"
Ovi 30: देवीपासूनि मनुष्यापाशीं । येणें झालें काय कार्येंसी । संदेह करोनि मानसीं । कैसा आलासि द्विजवरा ॥ ३० ॥
Transliteration: Dēvīpāsūni manuṣyāpāśīṁ | Yēṇēṁ jhālēṁ kāya kāryēnsī | Sandēha karōni mānasīṁ | Kaisā ālāsī dvijavarā || 30 ||
Meaning: "Why did you come from a Goddess to a human? With what purpose and doubt did you come, O Brahmin?"
अर्थ: "देवीने माणसाकडे पाठवले म्हणून तू मनात राग धरून आलास, मग आता इथे कशासाठी आलास?"
Ovi 31: ऐसें वचन ऐकोनि । आपुले मनींचें जाणिलें म्हणोनि । क्षमा करीं गा स्वामी म्हणोनि । लोटांगणीं येतसे ॥ ३१ ॥
Transliteration: Aisēṁ vacana aikōni | Āpulē manīñcēṁ jāṇilēṁ mhaṇōni | Kṣamā karīṁ gā svāmī mhaṇōni | Lōṭāṅgaṇīṁ yētasē || 31 ||
Meaning: Hearing this, he realized Guru knew his thoughts and begged for forgiveness, falling at His feet.
अर्थ: आपले मनोगत गुरूंनी ओळखले हे पाहून तो चकित झाला. तो म्हणाला, "स्वामी, मला क्षमा करा," आणि त्यांच्या चरणी पडला.
Ovi 32: म्हणे स्वामी आपण तमांध । तुझे दर्शनें झालों सुबुद्ध । अज्ञानें वेष्टिलों होतों मंद । नेणें सोय परब्रह्मा ॥ ३२ ॥
Transliteration: Mhaṇē svāmī āpaṇa tamāndha | Tujhē darśanēṁ jhālōṁ subuddha | Ajñānēṁ vēṣṭilōṁ hōtōṁ manda | Nēṇē sōya parabrahmā || 32 ||
Meaning: He said, "Lord, I was blinded by darkness. Your sight has made me wise. I was covered in ignorance."
अर्थ: "स्वामी, मी अज्ञानाने आंधळा झालो होतो. आपल्या दर्शनाने मला आता बुद्धी सुचली आहे. मी परब्रह्माला ओळखू शकलो नाही."
Ovi 33: तूं साक्षात् वस्तु म्हणोनि । नेणों आपण तमोगुणी । आजि माझा सुदिन । दर्शनें झालों पुनीत ॥ ३३ ॥
Transliteration: Tū sākṣāt vastu mhaṇōni | Nēṇōṁ āpaṇa tamōguṇī | Āji mājhā sudina | Darśanēṁ jhālōṁ punīta || 33 ||
Meaning: "I didn't know You were the Reality itself. Today is my lucky day; I am purified by Your sight."
अर्थ: "आपण साक्षात ईश्वर आहात हे माझ्या लक्षात आले नाही. आज माझा भाग्योदय झाला की मला आपले दर्शन मिळाले."
Ovi 34: पापकर्मी पापी आपण । पापात्मा नेणें निज खूण । पापें संभवलों पूर्ण । आलों शरण तुजपाशीं ॥ ३४ ॥
Transliteration: Pāpakarmī pāpī āpaṇa | Pāpātmā nēṇē nija khūṇa | Pāpēṁ sambhavalōṁ pūrṇa | Ālōṁ śaraṇa tujapāśī || 34 ||
Meaning: "I am a sinner and do not know my true self. I am born of sin and have come to seek refuge in You."
अर्थ: "मी पापी आहे आणि माझ्या कर्मामुळे मी ही शिक्षा भोगत आहे. आता मी पूर्णपणे आपल्या शरणी आलो आहे."
Ovi 35: तूं भक्तजनां आधार । शरणागता वज्रपंजर । ब्रीद वानिती सचराचर । श्रीगुरु नृसिंहसरस्वतीचें ॥ ३५ ॥
Transliteration: Tū bhaktajanāṁ ādhāra | Śaraṇāgatā vajrapañjara | Brīda vānitī sacarācara | Śrīgūru nr̥siṁhasarasvatīcēṁ || 35 ||
Meaning: "You are the support of devotees and a diamond fortress for those who surrender. The whole world praises You."
अर्थ: "आपण भक्तांचे आधार आहात आणि शरणागतांचे रक्षण करणारे आहात. आपले ब्रीद साऱ्या जगात विख्यात आहे."
Ovi 36: आजि माझें कुकर्म गेलें । परब्रह्मचरण देखिलें । मनोरथ माझे पुरले । कृपासागरा यतिराया ॥ ३६ ॥
Transliteration: Āji mājhēṁ kukarma gēlē | Parabrahma-caraṇa dēkhilē | Manōratha mājhē puralē | Kr̥pāsāgarā yatirāyā || 36 ||
Meaning: "Today my sins are gone as I saw the feet of Brahman. My desires are fulfilled, O ocean of mercy."
अर्थ: "आज माझे सर्व पाप नष्ट झाले, कारण मी आपल्या चरणांचे दर्शन घेतले. माझ्या सर्व इच्छा पूर्ण झाल्या."
Ovi 37: तूं भक्तजनाची कामधेनु । मनुष्यवेषीं आलासि अवतरोनु । तुझा पार जाणे कवणु । त्रैमूर्ति तूंचि होसी ॥ ३७ ॥
Transliteration: Tū bhaktajanācī kāmadhēnu | Manuṣyavēṣīṁ ālāsī avatarōnu | Tujhā pāra jāṇē kavaṇu | Traimūrti tūñci hōsī || 37 ||
Meaning: "You are the wish-fulfilling cow for devotees, incarnated in human form. Who can know your depth?"
अर्थ: "आपण भक्तांसाठी कामधेनू आहात आणि मानवी रूपात अवतार घेतला आहे. आपण साक्षात त्रैमूर्ती आहात."
Ovi 38: जैसी सगरांवरी गंगा । पावन करावया आली जगा । तैसा तूं भक्तसेवकवर्गा । तारावया अवतरलासी ॥ ३८ ॥
Transliteration: Jaisī sagarāṁvarī gaṅgā | Pāvana karāvayā ālī jagā | Taisā tū bhaktasēvakavargā | Tārāvayā avataralāsī || 38 ||
Meaning: "Just as Ganga came to purify the world, You have descended to save Your devotees."
अर्थ: "जशी भगीरथाने गंगेला पृथ्वीवर आणले, तसे आपण भक्तांना तारण्यासाठी या पृथ्वीवर अवतरला आहात."
Ovi 39: का अहिल्या झाली पाषाण । दिव्यदेही झाली लागतां चरण । तैसें मज आजि निर्गुण । झालें स्वामी गुरुनाथा ॥ ३९ ॥
Transliteration: Kā ahilyā jhālī pāṣāṇa | Divyadēhī jhālī lāgatāṁ caraṇa | Taisēṁ maja āji nirguṇa | Jhālēṁ svāmī gurunāthā || 39 ||
Meaning: "As Ahilya was turned from stone to divine body by touching Rama's feet, so has my state become today."
अर्थ: "रामाच्या चरणस्पर्शाने जशी अहिल्या पाषाणाची दिव्य देही झाली, तशीच माझी स्थिती आज आपल्या दर्शनाने झाली आहे."
Ovi 40: व्रतबंध विवाह झालियावरी । व्याधि उद्भवली आपुले शरीरीं । स्त्री राहिली माहेरीं । स्पर्शों नये शरीर म्हणे ॥ ४० ॥
Transliteration: Vratabandha vivāha jhāliyāvarī | Vyādhi udbhavalī āpulē śarīrīṁ | Strī rāhilī māhērīṁ | Sparśōṁ nayē śarīra mhaṇē || 40 ||
Meaning: "After my marriage, this disease arose. My wife stays at home and refuses to touch me."
अर्थ: तो आपली व्यथा सांगू लागला, "माझा विवाह झाल्यावर मला हा रोग झाला. माझी पत्नी माहेरी निघून गेली, ती मला स्पर्शही करू देत नाही."
Ovi 41: आपुले असती मातापिता । सकळ म्हणती जाईं परता । दुःख जाहलें अपरिमिता । संसार त्यजूनि निघालों ॥ ४१ ॥
Transliteration: Āpulē asatī mātāpitā | Sakaḷa mhaṇatī jāīṁ paratā | Duḥkha jhālēṁ aparimitā | Saṁsāra tyajūni nighālōṁ || 41 ||
Meaning: "Even my parents tell me to go away. My grief was boundless, so I left my family."
अर्थ: "माझे आई-वडीलही मला जवळ घेत नाहीत, ते मला दूर हाकलतात. या दुःखामुळे मी संसाराचा त्याग केला."
Ovi 42: गेलों होतों तुळजापुरा । उपवास केले अपारा । मज म्हणती तूं पापभारा । नव्हे तुज बरवें आतां ॥ ४२ ॥
Transliteration: Gēlōṁ hōtōṁ tuḷajāpurā | Upavāsa kēlē apārā | Maja mhaṇatī tū pāpabhārā | Navhē tuja baravēṁ ātā || 42 ||
Meaning: "I went to Tuljapur and fasted immensely. They told me I was heavily burdened with sin and wouldn't recover."
अर्थ: "मी तुळजापूरला गेलो, तिथे खूप उपवास केले. पण तिथले लोक मला म्हणाले की तू खूप पापी आहेस, तू बरा होणार नाहीस."
Ovi 43: निरोप दे जा सन्नतीं । जेथें चंदलापरमेश्वरी वसती । तेथें होईल निवृत्ति । पाप जाईल म्हणोनि ॥ ४३ ॥
Transliteration: Nirōpa dē jā sannatīṁ | Jēthēṁ candalāparamēśvarī vasatī | Tēthēṁ hōīla nivr̥ttī | Pāpa jāīla mhaṇōni || 43 ||
Meaning: "They sent me to Sannati where Chandala Parameshwari dwells, saying my sins would leave there."
अर्थ: "त्यांनी मला सन्नतीला पाठवले, जिथे चंदलापरमेश्वरीचे मंदिर आहे."
Ovi 44: तेथेंही कष्ट केले बहुत । नव्हेचि कांहीं, देवी उबगत । निरोप झाला जा म्हणत । कृपामूर्ति तुजपाशीं ॥ ४४ ॥
Transliteration: Tēthēṁhī kaṣṭa kēlē bahuta | Navhēci kāṁhī, dēvī ubagata | Nirōpa jhālā jā mhaṇata | Kr̥pāmūrti tujapāśī || 44 ||
Meaning: "I struggled there too, but nothing happened. The Goddess sent me to You, the embodiment of mercy."
अर्थ: "तिथेही खूप कष्ट घेतले, पण देवीने मला आपल्याकडे (श्रीगुरूकडे) पाठवले."
Ovi 45: ऐसें माझें दैव हीन । उबगताति देव आपण । मज देखोन निर्वाण । बाहेर घाला म्हणताति ॥ ४५ ॥
Transliteration: Aisēṁ mājhēṁ daiva hīna | Ubagatāti dēva āpaṇa | Maja dēkhōna nirvāṇa | Bāhēra ghālā mhaṇatāti || 45 ||
Meaning: "My fate is so low that even Gods are tired of me. Seeing my plight, they tell me to leave."
अर्थ: "माझे नशीब इतके वाईट आहे की साक्षात देवही मला कंटाळले आहेत आणि मला बाहेर काढायला सांगत आहेत."
Ovi 46: देवता आपण उबगताति । मनुष्य कैसे मज देखती । निर्वाणीं आलों तुम्हांप्रती । निर्धार केला मरणाचा ॥ ४६ ॥
Transliteration: Dēvatā āpaṇa ubagatāti | Manuṣya kaisē maja dēkhatī | Nirvāṇīṁ ālōṁ tumhāṁpratī | Nirdhāra kēlā maraṇācā || 46 ||
Meaning: "If Gods are tired, how will humans look at me? I have come to You in despair, determined to die."
अर्थ: "जर देवच मला कंटाळले, तर माणसे मला कशी स्वीकारतील? म्हणून मी आता मरण्याचा निश्चय करून आपल्याकडे आलो आहे."
Ovi 47: ऐसा पापी असोनि आपण । काय करावें अंग हीन । तोंड न पाहती कुष्ठी म्हणोन । मरण बरवें यापरतें ॥ ४७ ॥
Transliteration: Aisā pāpī asōni āpaṇa | Kāya karāvēṁ aṅga hīna | Tōṇḍa na pāhatī kuṣṭhī mhaṇōna | Maraṇa baravēṁ yāparatē || 47 ||
Meaning: "What should I do with this deformed body? No one looks at me because of leprosy; death is better than this."
अर्थ: "माझ्या या विद्रूप शरीराचे मी काय करू? कोणी माझे तोंड पाहायला तयार नाही. यापेक्षा मरण परवडले."
Ovi 48: आतां असे एक विनंति । होय अथवा नव्हे निश्चितीं । शीघ्र निरोपावें यति । दैवतें चाळवितीं आशाबद्धें ॥ ४८ ॥
Transliteration: Ātāṁ asē ēka vinanti | Hōya athavā navhē niścitīṁ | Śīghra nirōpāvēṁ yati | Daivatēṁ cāḷavitīṁ āśābaddhēṁ || 48 ||
Meaning: "Now I have one request: tell me clearly if I will be cured or not. Deities have kept me hopeful and sent me here."
अर्थ: "स्वामी, आता मला स्पष्ट सांगा की मी बरा होईन की नाही. देवीने मला आशेला लावून इकडे पाठवले आहे."
Ovi 49: मज चाड नाहीं शरीराची । प्राण देईन सुखेंचि । तूं रक्षक माउली शरणागताची । निरोपावें दातारा ॥ ४९ ॥
Transliteration: Maja cāḍa nāhīṁ śarīrācī | Prāṇa dēīna sukhēñci | Tū rakṣaka māulī śaraṇāgatācī | Nirōpāvēṁ dātārā || 49 ||
Meaning: "I don't care for this body; I will gladly give up my life. You are the protector of the surrendered."
अर्थ: "मला आता शरीराचा मोह नाही, मी प्राण द्यायला तयार आहे. आपण शरणागतांचे रक्षणकर्ते आहात, तरी मला मार्ग दाखवा."
Ovi 50: ऐसें करुणावचन ऐकोन । श्रीगुरु बोलती हांसोन । सोमनाथ ब्राह्मण बोलावून । निरोप देती न्याया संगमासी ॥ ५० ॥
Transliteration: Aisēṁ karuṇāvacana aikōna | Śrīgūru bōlatī hānsōna | Sōmanātha brāhmaṇa bōlāvūna | Nirōpa dētī nyāyā saṅgamāsī || 50 ||
Meaning: Hearing his compassionate words, Shri Guru spoke with a smile and sent for Somnath Brahmin to take him to the Sangam.
अर्थ: त्याचे बोलणे ऐकून श्रीगुरु हसले. त्यांनी 'सोमनाथ' नावाच्या ब्राह्मणाला बोलावले आणि सांगितले की याला संगमावर घेऊन जा.
Ovi 51: बरवा संकल्प सांगोनि । स्नान करवा षट्कूळभुवनीं । अश्वत्थप्रदक्षिणा करवूनि । वस्त्रें टाका दूर त्याचीं ॥ ५१ ॥
Transliteration: Baravā saṅkalpa sāṅgōni | Snāna karavā ṣaṭkūḷabhūvanīṁ | Aśvattha-pradakṣiṇā karavūni | Vastrēṁ ṭākā dūra tyācīṁ || 51 ||
Meaning: Shri Guru instructed to make him take a righteous vow, bathe at the holy confluence, perform circumambulation of the Ashwattha tree, and discard his old clothes.
अर्थ: "चांगला संकल्प सोडून त्याला संगमावर स्नान घाला, अश्वत्थाची प्रदक्षिणा करायला सांगा आणि त्याची जुनी वस्त्रे फेकून द्या."
Ovi 52: नवीं वस्त्रें द्या यासी । शीघ्र आणा पारणेसी । ऐसा निरोप देती त्यांसी । दोघे गेले झडकरी ॥ ५२ ॥
Transliteration: Navīṁ vastrēṁ dyā yāsī | Śīghra āṇā pāraṇēsī | Aisā nirōpa dētī tyānsī | Dōghē gēlē jhaḍakarī || 52 ||
Meaning: "Give him new clothes and bring him back quickly for the meal." Receiving this order, both of them hurried to the Sangam.
अर्थ: "त्याला नवीन वस्त्रे द्या आणि त्वरित मठात परत घेऊन या." असा निरोप मिळताच ते दोघे संगमावर गेले.
Ovi 53: स्नान करुनि बाहेर आला । शरीरवर्ण पालटला । अश्वत्थप्रदक्षिणा करूं लागला । सु-वर्ण जाहलें सर्वांग ॥ ५३ ॥
Transliteration: Snāna karuni bāhēra ālā | Śarīravarṇa pālaṭalā | Aśvattha-pradakṣiṇā karūṁ lāgalā | Su-varṇa jāhalēṁ sarvāṅga || 53 ||
Meaning: After bathing, his skin color changed. As he performed the circumambulations, his entire body became radiant like gold.
अर्थ: संगमावर स्नान करून बाहेर येताच त्याचे पांढरे कोड नष्ट झाले. त्याने अश्वत्थाला प्रदक्षिणा घातली आणि त्याचे शरीर सोन्यासारखे चकाकू लागले.
Ovi 54: वस्त्रें देती ब्राह्मणासी । जीर्ण वस्त्रें टाकिती दूरेंसी । जेथें टाकिती ते भूमीसी । क्षार भूमि होय त्वरित ॥ ५४ ॥
Transliteration: Vastrēṁ dētī brāhmaṇāsī | Jīrṇa vastrēṁ ṭākitī dūrēnsī | Jēthēṁ ṭākitī tē bhūmīsī | Kṣāra bhūmi hōya tvarita || 54 ||
Meaning: They gave him new clothes and threw away the old ones. The ground where the old clothes fell instantly became barren and salty due to the severity of the disease.
अर्थ: त्याला नवीन वस्त्रे देण्यात आली आणि जुनी वस्त्रे दूर फेकली गेली. ती वस्त्रे जिथे पडली, तिथली जमीन रोगाच्या तीव्रतेमुळे लगेच क्षारयुक्त (नापीक) झाली.
Ovi 55: सांगातें घेऊनि द्विजासी । सोमनाथ आला मठासी । चरणीं घातलें तयासी । लोक सर्व विस्मित ॥ ५५ ॥
Transliteration: Sāṅgātēṁ ghēūni dvijāsī | Sōmanātha ālā maṭhāsī | Caraṇīṁ ghātalēṁ tayāsī | Lōka sarva vismita || 55 ||
Meaning: Somnath brought the Brahmin back to the monastery. He bowed at Guru's feet, and all the people were amazed to see him.
अर्थ: सोमनाथ त्या ब्राह्मणाला घेऊन मठात परत आला. त्याला पाहून सर्व लोक थक्क झाले.
Ovi 56: नंदीनामें केला नमस्कार । संतोषें स्तोत्र करी अपार । हर्षें जाहला निर्भर । लोळतसे पादुकावरी ॥ ५६ ॥
Transliteration: Nandīnāmēṁ kēlā namaskāra | Santōṣēṁ stōtra karī apāra | Harṣēṁ jāhalā nirbhara | Lōḷatasē pādukāvarī || 56 ||
Meaning: Nandi bowed and sang praises with great joy. Overwhelmed with happiness, he prostrated himself on the Guru's sandals.
अर्थ: नंदी ब्राह्मणाने आनंदाने श्रीगुरूंना नमस्कार केला आणि तो त्यांच्या पादुकांवर लोळण घेऊ लागला.
Ovi 57: श्रीगुरु म्हणती तयासी । तुझी कामना झाली परियेसीं । सर्वांग आहे कैसी । अवलोकोनि पाहें म्हणती ॥ ५७ ॥
Transliteration: Śrīgūru mhaṇatī tayāsī | Tujhī kāmanā jhālī pariyēsīṁ | Sarvāṅga āhē kaisī | Avalōkōni pāhē mhaṇatī || 57 ||
Meaning: Shri Guru said, "Your wish is fulfilled. Now observe your entire body carefully."
अर्थ: श्रीगुरु म्हणाले, "तुझी इच्छा पूर्ण झाली आहे. आता तुझे शरीर नीट न्याहाळून बघ."
Ovi 58: पाहतां सर्वांग बरवें जाहलें । तावन्मात्र जंघेसी राहिलें । पाहतां मन त्याचें भ्यालें । म्हणे स्वामी असे थोडें ॥ ५८ ॥
Transliteration: Pāhatāṁ sarvāṅga baravēṁ jāhalē | Tāvanmātra jaṅghēsī rāhilē | Pāhatāṁ mana tyācēṁ bhyālē | Mhaṇē svāmī asē thōḍēṁ || 58 ||
Meaning: He saw his body was healed, but a small spot remained on his thigh. He got scared and said, "Lord, a little bit is still there."
अर्थ: त्याने पाहिले की सर्व शरीर स्वच्छ झाले आहे, पण मांडीवर एक छोटासा डाग शिल्लक राहिला होता. तो घाबरून म्हणाला, "स्वामी, थोडासा डाग उरला आहे."
Ovi 59: तुझी कृपादृष्टि झाली असतां । थोडें राहिलें म्हणे केवीं आतां । करीतसे दंडवता । कृपा करीं गा परमात्मा ॥ ५९ ॥
Transliteration: Tujhī kr̥pādr̥ṣṭi jhālī asatāṁ | Thōḍēṁ rāhilē mhaṇē kēvīṁ ātāṁ | Karītasē daṇḍavatā | Kr̥pā karīṁ gā paramātmā || 59 ||
Meaning: "When Your grace has fallen on me, why does this little bit remain?" He bowed again, asking for full mercy.
अर्थ: "स्वामी, आपली पूर्ण कृपा झाल्यावर हा थोडासा भाग का शिल्लक राहिला?" असे म्हणून तो पुन्हा चरणी लागला.
Ovi 60: श्रीगुरुमूर्ति निरोपिती तयासी । तूं संशय करोनि आलासी । मनुष्य काय करील म्हणोनि मानसीं । तेणें गुणें राहिलें थोडें ॥ ६० ॥
Transliteration: Śrīgūrumūrti nirōpitī tayāsī | Tū saṁśaya karōni ālāsī | Manuṣya kāya karīla mhaṇōni mānasīṁ | Tēṇēṁ guṇēṁ rāhilē thōḍē || 60 ||
Meaning: Shri Guru said, "You came with a doubt, thinking what a man could do. That is why that small part remains."
अर्थ: श्रीगुरु म्हणाले, "तू मनात शंका घेऊन आला होतास की 'एक माणूस मला काय बरे करणार?', त्या संशयामुळेच तेवढा भाग शिल्लक राहिला आहे."
Ovi 61: त्यासी असे एक प्रतीकार । तुवां कवित्व सांगावें अपार । आमुची स्तुति करावी निरंतर । बरवें होईल तुज मग ॥ ६१ ॥
Transliteration: Tyāsī asē ēka pratīkāra | Tuvā kavitva sāṅgāvēṁ apāra | Āmucī stuti karāvī nirantara | Baravē mhaṇatī hōīla tuja maga || 61 ||
Meaning: "There is one remedy: compose vast poetry and praise Me constantly. Then you will be completely healed."
अर्थ: "त्यावर आता एकच उपाय आहे, तू काव्याद्वारे आमची स्तुती कर, म्हणजे उरलेला डागही नष्ट होईल."
Ovi 62: नंदीनामा म्हणे स्वामीसी । लिखित नेणें वाचायासी । कैसें करुं मी कवित्वासी । मंदमति असे आपण ॥ ६२ ॥
Transliteration: Nandīnāmā mhaṇē svāmīsī | Likhita nēṇē vācāyāsī | Kaisēṁ karuṁ mī kavitvāsī | Mandamati asē āpaṇa || 62 ||
Meaning: Nandi said, "Lord, I don't know how to read or write. How can I compose poetry? I am dim-witted."
अर्थ: नंदी ब्राह्मण म्हणाला, "स्वामी, मला लिहिता-वाचता येत नाही, मी तर मतिमंद आहे. मग मी आपली स्तुती करण्यासाठी काव्य कसे करू?"
Ovi 63: काय जाणें कवित्वस्थिति । मज नाहीं काव्यव्युत्पत्ति । स्वामी ऐसा निरोप देती । म्हणोनि चरणीं लागला ॥ ६३ ॥
Transliteration: Kāya jāṇē kavitvasthiti | Maja nāhī kāvyavyutpatti | Svāmī aisā nirōpa dētī | Mhaṇōni caraṇīṁ lāgalā || 63 ||
Meaning: "I know nothing of poetic structures or derivations." Hearing Guru's command, he fell at His feet.
अर्थ: "मला काव्याचे काहीच ज्ञान नाही." असे म्हणून तो श्रीगुरूंच्या चरणी लागला.
Ovi 64: श्रीगुरु म्हणती द्विजासी । मुख उघडीं काढीं जिव्हेसी । विभूति शिंपिती तयासी । ज्ञान उपजलें ब्राह्मणा ॥ ६४ ॥
Transliteration: Śrīgūru mhaṇatī dvijāsī | Mukha ughaḍīṁ kāḍhīṁ jivhēsī | Vibhūti śimpitī tayāsī | Jñāna upajalē brāhmaṇā || 64 ||
Meaning: Shri Guru told him to open his mouth and stick out his tongue. He sprinkled holy ash on it, and the Brahmin attained instant knowledge.
अर्थ: श्रीगुरु म्हणाले, "तुझे तोंड उघड आणि जीभ बाहेर काढ." त्यांनी त्याच्या जिभेवर विभूती टाकली, आणि त्या ब्राह्मणाला तत्काळ आत्मज्ञान प्राप्त झाले.
Ovi 65: चरणांवरी ठेविला माथा । उभा ठेला स्तोत्र करितां । म्हणे स्वामी मी नेणता । सेवेसी नव्हे अराणुक ॥ ६५ ॥
Transliteration: Caraṇāṁvarī ṭhēvilā māthā | Ubhā ṭhēlā stōtra karitāṁ | Mhaṇē svāmī mī nēṇatā | Sēvēsī navhē arāṇuka || 65 ||
Meaning: Bowing his head at Guru's feet, he stood up and began praising. He said, "Lord, I am ignorant and unfit for Your service."
अर्थ: तो श्रीगुरूंच्या चरणी नतमस्तक झाला आणि स्तुती करू लागला, "स्वामी, मी अज्ञानी आहे, आपली सेवा करण्यास मी पात्र नाही."
Ovi 66: मायापाशीं वेष्टोनि । बुडत होतों संसारगहनीं । आठवण न करीं कधीं मनीं । तुझे चरणा विसरलों ॥ ६६ ॥
Transliteration: Māyāpāśīṁ vēṣṭōni | Buḍata hōtōṁ saṁsāragahanīṁ | Āṭhavaṇa na karīṁ kadhīṁ manīṁ | Tujhē caraṇā visaralōṁ || 66 ||
Meaning: "Entrapped by Maya, I was drowning in the forest of worldly life. I never remembered you and forgot your feet."
अर्थ: "मी मायेच्या पाशात अडकून या संसाररूपी अरण्यात बुडत होतो. मी कधीही आपल्या चरणांचे स्मरण केले नाही."
Ovi 67: संसार-सागर मायाजाळ । योनीं जन्मोनि चौऱ्यांशीं लक्षकुळ । आठवण नव्हे तुझें नाम केवळ । मंदमति जाहली मज ॥ ६७ ॥
Transliteration: Saṁsāra-sāgara māyājāḷa | Yōnīṁ janmōni cauṟyāṁśīṁ lakṣakuḷa | Āṭhavaṇa navhē tujhēṁ nāma kēvaḷa | Mandamati jāhalī maja || 67 ||
Meaning: "In the ocean of worldliness and the trap of Maya, through 8.4 million species, I couldn't remember Your name. I became dull-witted."
अर्थ: "चौऱ्यांशी लक्ष योनींमधून फिरताना आणि या संसाराच्या जाळ्यात अडकल्यामुळे मला आपल्या नामाचा विसर पडला होता."
Ovi 68: स्वेदज अंडज उद्भिज्जेंसी । जन्मा आलों पशुयोनीसी । तव ज्ञान कैंचें आम्हांसी । स्थावर जंगम जैं होतों ॥ ६८ ॥
Transliteration: Svēdaja aṇḍaja udbhijjēnsī | Janmā ālōṁ paśuyōnīsī | Tava jñāna kaiñcēṁ āmhānsī | Sthāvara jaṅgama jaiṁ hōtōṁ || 68 ||
Meaning: "Born as beings from sweat, eggs, or seeds, and as animals, how could I have Your knowledge while being immobile or mobile creatures?"
अर्थ: "स्वेदज, अंडज, उद्भिज्ज अशा विविध योनींत आणि पशू-पक्षी म्हणून जन्म घेताना मला आपले ज्ञान कोठून असणार?"
Ovi 69: नानायोनींत मनुष्य विशेष । शूद्रादि याती बहुवस । जधीं होतों त्या जन्मास । काय जाणें तुझी सोय ॥ ६९ ॥
Transliteration: Nānāyōnīnt manuṣya viśēṣa | Śūdrādi yātī bahuvasa | Jadhī hōtōṁ tyā janmāsa | Kāya jāṇē tujhī sōya || 69 ||
Meaning: "Among various species, even as humans in different castes, when I lived those lives, I knew nothing of You."
अर्थ: "अनेक जन्मांत मी मनुष्य होतो, पण अज्ञानामुळे मला आपली ओळख पटली नाही."
Ovi 70: समस्त जन्मांत एक । ब्राह्मनजन्म विशेख । काय करावें होऊनि मूर्ख । गुरुसोय नेणे नर ॥ ७० ॥
Transliteration: Samasta janmānt ēka | Brāhmanajanma viśēkha | Kāya karāvēṁ hōūni mūrkha | Gurusōya nēṇē nara || 70 ||
Meaning: "A Brahmin birth is special among all births. But what use is it if a man remains a fool and doesn't know his Guru?"
अर्थ: "सर्व जन्मांत ब्राह्मण जन्म श्रेष्ठ आहे, पण जर मनुष्य गुरूंना ओळखू शकला नाही, तर तो जन्म व्यर्थ आहे."
Ovi 71: मातेचें शोणित पित्याचें रेत । संपर्क जहाला जननीगर्भांत । जैसें सुवर्ण मुशीं असे कढत । दिवस पांच बुद्बुदाकार ॥ ७१ ॥
Transliteration: Mātēcēṁ śōṇita pityācēṁ rēta | Samparka jahālā jananīgarbhānt | Jaisēṁ suvarṇa muśīṁ asē kaḍhata | Divasa pāñca budbudākāra || 71 ||
Meaning: "With the mother's blood and father's seed, life begins in the womb. Like gold heating in a crucible, for five days it is like a bubble."
अर्थ: (गर्भावस्थेचे वर्णन) "आई-वडिलांच्या संयोगातून गर्भाची निर्मिती होते. पहिल्या पाच दिवसात तो एखाद्या बुडबुड्यासारखा असतो."
Ovi 72: पंधरा दिवसा होय स्थिर । एक रस होऊनि निर्धार । तधीं मी काय जाणें गुरु । नाहीं पंचतत्त्वें मज ॥ ७२ ॥
Transliteration: Padharā divasā hōya sthira | Ēka rasa hōūni nirdhāra | Tadhī mī kāya jāṇē guru | Nāhī pañcatattvēṁ maja || 72 ||
Meaning: "In fifteen days, it becomes stable as a single essence. At that time, how could I know Guru, as I didn't even have the five elements?"
अर्थ: "पंधरा दिवसांनी तो गर्भ स्थिर होतो, तेव्हा मला आपले ज्ञान नव्हते कारण माझ्यात पंचतत्त्वेही नव्हती."
Ovi 73: मासें एक पिंड होय । द्वय मासीं शिर पाय । तिसरे मासीं सर्व अवयव । नवद्वारें झालीं मग ॥ ७३ ॥
Transliteration: Māsa ēka piṇḍa hōya | Dvaya māsī śira pāya | Tisarē māsī sarva avayava | Navadvārēṁ jhālīṁ maga || 73 ||
Meaning: "In one month, it becomes a mass. In two months, head and feet appear. In the third month, all limbs and nine openings are formed."
अर्थ: "एका महिन्याने पिंडाचा आकार आता येतो, दोन महिन्यांनी डोके व पाय आणि तीन महिन्यांनी सर्व अवयव व नऊ द्वारे तयार होतात."
Ovi 74: पंचतत्त्वे होतीं एक । वायु-आप-पृथ्वी-तेज-ख । प्राण आला तात्काळिक । तधीं स्मरण कैंचें मज ॥ ७४ ॥
Transliteration: Pañcatattvē hōtīṁ ēka | Vāyu-āpa-pr̥thvī-tēja-kha | Prāṇa ālā tātkāḷika | Tadhī smaraṇa kaiñcēṁ maja || 74 ||
Meaning: "The five elements—Air, Water, Earth, Fire, and Space—unite. Life-force enters, yet I have no memory of You."
अर्थ: "जेव्हा पंचतत्त्वे एकत्र येऊन प्राण शरीरात प्रवेश करतो, तेव्हाही मला आपले स्मरण नव्हते."
Ovi 75: पांचवे मासीं त्वचा रोम । सहावे मासीं उच्छ्वास आम्हां । सातवे मासीं श्रोत्र जिव्हा । मेद मज्जा दृढ जाहली ॥ ७५ ॥
Transliteration: Pāñcavē māsīṁ tvacā rōma | Sahāvē māsīṁ ucchvāsa āmhā | Sātavē māsīṁ śrōtra jivhā | Mēda majjā dr̥ḍha jāhalī || 75 ||
Meaning: "In the fifth month, skin and hair appear. In the sixth, breath starts. In the seventh, ears, tongue, fat, and marrow become firm."
अर्थ: "पाचव्या महिन्यात त्वचा, सहाव्या महिन्यात श्वास आणि सातव्या महिन्यात कान, जीभ व हाडांमधील मज्जा तयार होते."
Ovi 76: ऐसे नव मास कष्टत । होतों जननिये-गर्भांत । रुधिर-विष्ठा-मूत्रांत । कष्टलों भारी स्वामिया ॥ ७६ ॥
Transliteration: Aisē nava māsa kaṣṭata | Hōtōṁ jananiyē-garbhānt | Rudhira-viṣṭhā-mūtrānt | Kaṣṭalōṁ bhārī svāmiyā || 76 ||
Meaning: "Thus struggling for nine months in the mother's womb, among blood, waste, and urine, I suffered greatly, Lord."
अर्थ: "आईच्या गर्भात रक्त, विष्ठा आणि मूत्राच्या दुर्गंधीत मी नऊ महिने अत्यंत कष्ट भोगले."
Ovi 77: माता भक्षी उष्ण क्षार । तेणें तीक्ष्णें कष्टलों अपार । पडे लोळे अनेक प्रकार । दुःख तेव्हां सांगूं कोणा ॥ ७७ ॥
Transliteration: Mātā bhakṣī uṣṇa kṣāra | Tēṇēṁ tīkṣṇēṁ kaṣṭalōṁ apāra | Paḍē lōḷē anēka prakāra | Duḥkha tēvhā sāṅgūṁ kōṇā || 77 ||
Meaning: "The mother ate hot and salty food, which caused me immense pain. I would tumble and roll in various ways; to whom could I tell my grief then?"
अर्थ: "आई जे तिखट-मीठ खाते, त्याचे चटके मला गर्भात बसत असत. ते दुःख मी कोणाला सांगणार होतो?"
Ovi 78: मना आलें भक्षण करीं । दुःख होय मज अपारी । ऐसें नवमासवरी । मातागर्भीं कष्टलों ॥ ७८ ॥
Transliteration: Manā ālēṁ bhakṣaṇa karī | Duḥkha hōya maja apārī | Aisēṁ navamāsavarī | Mātagarbhīṁ kaṣṭalōṁ || 78 ||
Meaning: "Whatever she chose to eat caused me deep suffering. For nine months, I struggled in the mother's womb."
अर्थ: "आईच्या खाण्यामुळे मला आत खूप त्रास व्हायचा. अशा प्रकारे मी नऊ महिने गर्भात हाल सोसले."
Ovi 79: तधीं कैचें तुझें स्मरण । वेष्टिलों होतों मायावरणें । स्मरलों नाहीं तुझे चरण । मग योनिमुखीं जन्मलों ॥ ७९ ॥
Transliteration: Tadhī kaiñcēṁ tujhēṁ smaraṇa | Vēṣṭilōṁ hōtōṁ māyāvaraṇēṁ | Smaralōṁ nāhī tujhē caraṇa | Maga yōnimukhīṁ janmalōṁ || 79 ||
Meaning: "How could I remember You then? Wrapped in the veil of Maya, I didn't recall Your feet. Then I was born."
अर्थ: "त्यावेळी मला मायेने वेढले होते, त्यामुळे आपल्या चरणांची आठवण नव्हती. मग माझा जन्म झाला."
Ovi 80: उपजतांचि आपणासी । आयुष्य लिहिलें लल्लाटेसी । अर्घ गेलें वृथा निशीं । रात्रीं निद्रा मानवा ॥ ८० ॥
Transliteration: Upajatāñci āpaṇāsī | Āyuṣya lihalēṁ lallāṭēsī | Argha gēlē vr̥thā niśī | Rātrīṁ nidrā mānavā || 80 ||
Meaning: "As soon as I was born, my lifespan was written on my forehead. Half of it was wasted in sleep during the nights."
अर्थ: "जन्मानंतर कपाळावर आयुष्य लिहिले गेले, पण त्यातील अर्धे आयुष्य तर झोपण्यातच निघून जाते."
Ovi 81: उरले आयुष्यांत देखा । तीन भाग केले विशेखा । बाल यौवन वृद्धाप्य ऐका । निर्माण झाले तये वेळीं ॥ ८१ ॥
Transliteration: Uralē āyuṣyānt dēkhā | Tīna bhāga kēlē viśēkhā | Bāla yauvana vr̥ddhāpya aikā | Nirmāṇa jhālē tayē vēḷī || 81 ||
Meaning: "In the remaining life, three stages were formed: childhood, youth, and old age."
अर्थ: "उरलेल्या आयुष्याचे तीन भाग होतात— बालपण, तारुण्य आणि म्हातारपण."
Ovi 82: बाळपणीं आपणासी । कष्ट झाले असमसाहसी । मज घालिती पाळणेसी । मूळमूत्रांत लोळतसें ॥ ८२ ॥
Transliteration: Bāḷapaṇīṁ āpaṇāsī | Kaṣṭa jhālē asamāsāhasī | Maja ghālitī pāḷaṇēsī | Mūḷamūtrānt lōḷatasēṁ || 82 ||
Meaning: "In childhood, I faced extreme hardships. Put into a cradle, I would roll in my own urine and waste."
अर्थ: "बालपणात मला खूप कष्ट झाले. पाळण्यात स्वतःच्याच विष्ठा-मूत्रात मी लोळत असे."
Ovi 83: बाळपणींचें दुःख आठवितां । शोक होय मज अपरिमिता । काय सांगूं गुरुनाथा । नाना आपदा भोगिल्या ॥ ८३ ॥
Transliteration: Bāḷapaṇīñcēṁ duḥkha āṭhavitāṁ | Śōka hōya maja aparimitā | Kāya sāṅgūṁ gurunāthā | Nānā āpadā bhōgilyā || 83 ||
Meaning: "Thinking of childhood suffering brings me boundless sorrow. What can I say, Guru-Natha? I faced many calamities."
अर्थ: "बालपणातील ते दुःख आठवले की आजही शोक होतो. मी खूप हाल सोसले आहेत."
Ovi 84: शयनस्थानीं मलमूत्रांत । निरंतर असें लोळत । आपली विष्ठा आपण खात । अज्ञानतिमिरें वेष्टिलों ॥ ८४ ॥
Transliteration: Śayanasthānīṁ malamūtrānt | Nirantara asēṁ lōḷata | Āpalī viṣṭhā āpaṇa khāta | Ajñānatimirēṁ vēṣṭilōṁ || 84 ||
Meaning: "Lying in waste where I slept, constantly rolling around. Covered in the darkness of ignorance, I even ate my own waste."
अर्थ: "अज्ञानामुळे मी मलमूत्रात पडून असायचो, तीच विष्ठा तोंडात घ्यायचो. मी अंधारात होतो."
Ovi 85: एकादे समयीं आपणासी । पोटशूळ उठे बहुवसीं । रोदन करितां परियेसीं । स्तनपान मला करविती ॥ ८५ ॥
Transliteration: Ēkādē samayīṁ āpaṇāsī | Pōṭaśūḷa uṭhē bahuvasīṁ | Rōdana karitāṁ pariyēsīṁ | Stanapāna malā karavitī || 85 ||
Meaning: "Sometimes when I had severe stomach pain and would cry, they would make me breastfeed."
अर्थ: "जेव्हा माझे पोट दुखायचे आणि मी रडायचो, तेव्हा आईला वाटायचे की मला भूक लागली आहे आणि ती मला दूध पाजायची."
Ovi 86: क्षुधाक्रांत होय बहुत । मज म्हणती पोट दुखत । अंगुली घालूनि मुखांत । वोखद मज पाजविती ॥ ८६ ॥
Transliteration: Kṣudhākrānta hōya bahuta | Maja mhaṇatī pōṭa dukhat | Aṅgulī ghālūni mukhānt | Vōkhada maja pājavitī || 86 ||
Meaning: "When I was very hungry, they said my stomach hurt. Putting fingers in my mouth, they made me drink medicine."
अर्थ: "जेव्हा मला भूक लागलेली असायची, तेव्हा लोकांना वाटायचे की माझे पोट दुखतेय, मग ते मला कडू औषध पाजायचे."
Ovi 87: ऐसें क्षुधेनें पीडितां बहुत । मज घालिती पाळण्यांत । हालविती पर्यंदें गात । क्षुधाक्रांत रुदन करीं ॥ ८७ ॥
Transliteration: Aisēṁ kṣudhēnēṁ pīḍitāṁ bahuta | Maja ghālitī pāḷaṇyānt | Hālavitī paryandēṁ gāta | Kṣudhākrānta rudana karīṁ || 87 ||
Meaning: "Suffering from hunger, they would put me in the cradle, rock it and sing, while I cried out in hunger."
अर्थ: "मला भूक लागली असताना ते मला पाळण्यात घालून गाणी म्हणत झोपवायचा प्रयत्न करायचे."
Ovi 88: म्हणती रुदन करितो बाळ । मुखीं शिंपिती कांजीतेल । रक्षा बांधिती मंत्रें केवळ । नेणे माता भूक माझी ॥ ८८ ॥
Transliteration: Mhaṇatī rudana karitō bāḷa | Mukhī śimpitī kāñjītēla | Rakṣā bāndhitī mantrēṁ kēvaḷa | Nēṇē mātā bhūka mājhī || 88 ||
Meaning: "They said the baby is crying and sprinkled oil on my face. They tied protective amulets with mantras, but mother didn't know about my hunger."
अर्थ: "आईला माझी भूक समजत नसे. ती मला मंत्राची रक्षा (राख) लावायची किंवा तेल लावायची."
Ovi 89: पाळण्यांत घालिती कौतुकें । प्रावरणांत असतां वृश्चिकें । मारीतसे पाठीं डंक । प्रलाप मी करीतसें ॥ ८९ ॥
Transliteration: Pāḷaṇyānt ghālitī kautukēṁ | Prāvaraṇānt asatāṁ vr̥ścikēṁ | Mārītasē pāṭhīṁ ḍaṅka | Pralāpa mī karītasēṁ || 89 ||
Meaning: "They put me in the cradle with fondness, but if a scorpion was in the covers, it would sting my back, and I would scream."
अर्थ: "कधी कधी पाळण्यातील कपड्यांत विंचू असायचा आणि तो मला डंख मारायचा, तेव्हा मी वेदनेने ओरडायचो."
Ovi 90: आणिक पाळणा हालविती । राहें राहें उगा म्हणती । स्तनपान मागुती करविती । वृश्चिकविष नेणतां ॥ ९० ॥
Transliteration: Āṇika pāḷaṇā hālavitī | Rāhēṁ rāhēṁ ugā mhaṇatī | Stanapāna māgutī karavitī | Vr̥ścikaviṣa nēṇatāṁ || 90 ||
Meaning: "They would rock the cradle more, telling me to be quiet. They'd make me feed again, not knowing of the scorpion's venom."
अर्थ: "लोकांना वाटायचे मी उगाच रडतोय, ते मला शांत करायचे आणि दूध पाजायचे, पण विंचवाचे विष त्यांना माहित नसायचे."
Ovi 91: तेणें दुःखें स्तनपान न करीं । मागुती घालिती पाळण्याभीतरीं । वृश्चिक मज डंक मारी । प्राणांतिक मज होय ॥ ९१ ॥
Transliteration: Tēṇēṁ duḥkhēṁ stanapāna na karī | Māgutī ghālitī pāḷaṇyābhītarī | Vr̥ścika maja ḍaṅka mārī | Prāṇāntika maja hōya || 91 ||
Meaning: "Due to that pain, I wouldn't feed. They'd put me back in the cradle where the scorpion stung me again; it was life-threatening."
अर्थ: "विंचवाच्या वेदनेमुळे मी दूध पीत नसे, मग ते मला पुन्हा पाळण्यात टाकायचे, जिथे तो विंचू पुन्हा डंख मारायचा."
Ovi 92: माता खाय अंबट तिखट । स्तनपानें मज अपार वोखट । अति मधुर क्षीर अंबट । तेणें खोकतसें सर्वकाळीं ॥ ९२ ॥
Transliteration: Mātā khāya ambaṭa tikhaṭa | Stanapānēṁ maja apāra vōkhaṭa | Ati madhura kṣīra ambaṭa | Tēṇēṁ khōkatasēṁ sarvakāḷīṁ || 92 ||
Meaning: "Mother ate sour and spicy things; breastfeeding was very harmful to me. The sweet milk became sour, causing me to cough constantly."
अर्थ: "आईने खाल्लेल्या तिखट-आंबट अन्नामुळे तिचे दूध मला बाधायचे आणि मला खोकला व्हायचा."
Ovi 93: नाना औषधें मज देती । तेणें माझे डोळे दुखती । कुंकुम लवणक्षार भरिती । डोळे आले म्हणोनियां ॥ ९३ ॥
Transliteration: Nānā auṣadhēṁ maja dētī | Tēṇēṁ mājhē dōḷē dukhatī | Kuṅkuma lavaṇakṣāra bharitī | Dōḷē ālē mhaṇōniyā || 93 ||
Meaning: "They gave me various medicines that hurt my eyes. They filled them with kumkum and salt, saying my eyes were infected."
अर्थ: "लोक माझ्या डोळ्यांत औषध म्हणून मीठ-मिर्ची किंवा काहीतरी तिखट टाकायचे, ज्यामुळे माझे डोळे अधिक दुखायचे."
Ovi 94: ऐसे कष्ट धुरंधर । बाळपणीं जाहले अपार । वाढलों कष्ट भोगीत फार । वर्षें बारा लोटलीं ॥ ९४ ॥
Transliteration: Aisē kaṣṭa dhurandhara | Bāḷapaṇīṁ jāhalē apāra | Vāḍhalōṁ kaṣṭa bhōgīta phāra | Varṣēṁ bārā lōṭalīṁ || 94 ||
Meaning: "Such immense hardships were faced in childhood. I grew up suffering greatly for twelve years."
अर्थ: "अशा कष्टांत माझी पहिली बारा वर्षे (बालपण) निघून गेली."
Ovi 95: तधीं तुझे चरणस्मरणा । मज कैंचें गा देवराणा । कष्टलों मी याचिगुणा । पूर्वजन्म नाठवेचि ॥ ९५ ॥
Transliteration: Tadhī tujhē caraṇasmaranā | Maja kaiñcēṁ gā dēvarāṇā | Kaṣṭalōṁ mī yāciguṇā | Pūrvajanma nāṭhavēci || 95 ||
Meaning: "Then, how could I remember Your feet, O King of Gods? Because of these sufferings, I don't even remember my past life."
अर्थ: "त्या कष्टांमुळे मला आपल्या चरणांचे स्मरण नव्हते आणि मी माझा पूर्वजन्मही विसरलो होतो."
Ovi 96: दोन भाग उरले आपणासी । मदनें व्यापिलें शरीरासी । जैसा पतंग दीपासी । भ्रमिजेत उन्मत्त ॥ ९६ ॥
Transliteration: Dōna bhāga uralē āpaṇāsī | Madanēṁ vyāpilēṁ śarīrāsī | Jaisā pataṅga dīpāsī | Bhramijēta unmatta || 96 ||
Meaning: "Two parts of life remained. Lust (Madana) took over my body. Like a moth to a flame, I was madly deluded."
अर्थ: "तारुण्यात पदार्पण केल्यावर मी कामासक्त (मदन) झालो. दिव्यावर झेपावणाऱ्या पतंगाप्रमाणे मी भ्रमिष्ट झालो."
Ovi 97: नेणें मी गुरु माता पिता । समस्तांतें करी निंदा वार्ता । परस्त्रीवरी करीं चिंता । कुळाकुळ न विचारीं ॥ ९७ ॥
Transliteration: Nēṇē mī guru mātā pitā | Samastāntēṁ karī nindā vārtā | Parastrīvarī karīṁ cintā | Kuḷākuḷa na vicārīṁ || 97 ||
Meaning: "I knew not Guru, mother, or father. I slandered everyone, obsessed over other women, and ignored all ethics."
अर्थ: "तारुण्यात मी आई-वडील आणि गुरूंना विसरलो. सर्वांची निंदा करू लागला आणि परस्त्रियांच्या मागे लागलो."
Ovi 98: ब्राह्माणतें निंदा करी । वृद्धाच्या चेष्टा करी अपारी । मदें व्यापिलें असे भारी । नाठवती तुझे चरण मज ॥ ९८ ॥
Transliteration: Brāhmāṇatēṁ nindā karī | Vr̥ddhācyā cēṣṭā karī apārī | Madēṁ vyāpilēṁ asē bhārī | Nāṭhavatī tujhē caraṇa maja || 98 ||
Meaning: "I slandered Brahmins and mocked the elderly. Overwhelmed with pride, I didn't remember your feet."
अर्थ: "मी वृद्धांची थट्टा करायचो, ब्राह्मणांची निंदा करायचो. गर्वामुळे मला आपले चरण आठवले नाहीत."
Ovi 99: मांसाचे कवळाकारणें । मत्स्य जाय जेवीं प्राणें । तैसा आपण मदनबाणें । वश्य जाहलों इंद्रियांसी ॥ ९९ ॥
Transliteration: Māṁsācē kavaḷākāraṇē | Matsya jāya jēvīṁ prāṇē | Taisā āpaṇa madanabāṇē | Vaśya jāhalōṁ indriyānsī || 99 ||
Meaning: "Like a fish losing its life for a piece of meat, I became enslaved to the senses by the arrows of lust."
अर्थ: "जसा मासा मांसाच्या तुकड्यासाठी जीव देतो, तसा मी इंद्रियांच्या आहारी गेलो होतो."
Ovi 100: नानावर्ण स्त्रियां भोगिलें । परद्रव्य अपहारिलें । सिद्धमहंतांतें निंदिलें । दृष्टीं न दिसे माझे कांहीं ॥ १०० ॥
Transliteration: Nānāvarṇa striyāṁ bhōgilē | Paradravya apahārilē | Siddhamahantāntēṁ nindilē | Dr̥ṣṭīṁ na disē mājhēṁ kāṁhī || 100 ||
Meaning: "I associated with various women and stole others' wealth. I slandered sages; I could see nothing clearly."
अर्थ: "मी अनेक चुकीची कामे केली, दुसऱ्यांचे धन चोरले आणि साधू-संतांची निंदा केली."
Ovi 101: ऐसा मदनें व्यापूनि । मागें पुढें न पाहें नयनीं । पतंग जाय धांवोनि । दीपावरी पडे जैसा ॥ १०१ ॥
Transliteration: Aisā madanēṁ vyāpūni | Māgēṁ puḍhēṁ na pāhēṁ nayanīṁ | Pataṅga jāya dhāṁvōni | Dīpāvarī paḍē jaisā || 101 ||
Meaning: "Occupied by lust, I didn't look back or ahead. Like a moth rushing to fall onto a lamp."
अर्थ: "कामांध झाल्यामुळे मी पुढे-मागे काहीच पाहिले नाही आणि स्वतःचा नाश करून घेतला."
Ovi 102: ऐसा वेष्टोनि मदनबाणीं । न ऐके सुबुद्धि कधीं श्रवणीं । सोय न धरीं तुझे चरणीं । यौवनपण गेलें ऐसें ॥ १०२ ॥
Transliteration: Aisā vēṣṭōni madanabāṇī | Na aikē subuddhi kadhī śravaṇī | Sōya na dharīṁ tujhē caraṇī | Yauvanapaṇa gēlē aisē || 102 ||
Meaning: "Pierced by lust's arrows, I never listened to good advice. I didn't seek Your feet; thus youth passed."
अर्थ: "कुणाचेही ऐकले नाही आणि तारुण्य अशाच चुकीच्या मार्गात खर्च केले."
Ovi 103: मग वृद्धाप्य आले शरीरासी । उबग होय स्त्रीपुत्रांसी । श्वासोच्छ्वास कफेसीं । सदा खोकला होय मज ॥ १०३ ॥
Transliteration: Maga vr̥ddhāpya ālē śarīrāsī | Ubaga hōya strīputrānsī | Śvāsōcchvāsa kaphēsī | Sadā khōkalā hōya maja || 103 ||
Meaning: "Then old age came to the body. Wife and sons got tired of me. Breathless with phlegm, I coughed constantly."
अर्थ: "मग म्हातारपण आले, तेव्हा स्वतःची मुले आणि पत्नी सुद्धा मला कंटाळली. मला सतत खोकला आणि श्वासाचा त्रास होऊ लागला."
Ovi 104: अवयव सर्वही गलित होती । केश पांढरे होती त्वरिती । दंतहीन, श्रवणें न ऐकिजेति । दृष्टीं न दिसे, नासिक गळतें ॥ १०४ ॥
Transliteration: Avayava sarvahī galita hōtī | Kēśa pāṇḍharē hōtī tvaritī | Dantahīna, śravaṇēṁ na aikijēti | Dr̥ṣṭīṁ na disē, nāsika gaḷatē || 104 ||
Meaning: "All limbs became weak, hair turned white quickly. Toothless, unable to hear or see; the nose kept running."
अर्थ: "शरीर थकले, केस पांढरे झाले, दात पडले, कान ऐकू येईनासे झाले आणि डोळ्यांनी दिसणे बंद झाले."
Ovi 105: ऐसा नाना रोगें कष्टतां । तुमची सेवा कधीं घडणें आतां । स्वामी तारका श्रीगुरुनाथा । संसारसागरा कडे करीं ॥ १०५ ॥
Transliteration: Aisā nānā rōgēṁ kaṣṭatā | Tumacī sēvā kadhī ghaḍaṇēṁ ātā | Svāmī tārakā śrīgurunāthā | Saṁsārasāgarā kaḍē karī || 105 ||
Meaning: "Struggling with various diseases, how can I serve you now? Lord savior Shri Guru-Natha, take me across the ocean of worldliness."
अर्थ: "आता या आजारपणात मी आपली सेवा कशी करणार? हे गुरुनाथा, आता तुम्हीच मला या संसारातून तारा."
Ovi 106: ऐसा मंदमति आपण । न ओळखेचि तुझे चरण । तूंचि केवळ नारायण । अवतार तूं श्रीगुरुमूर्ति ॥ १०६ ॥
Transliteration: Aisā mandamati āpaṇa | Na ōḷakhēci tujhē caraṇa | Tūñci kēvaḷa nārāyaṇa | Avatāra tū śrīgūrūmūrti || 106 ||
Meaning: "I, the dull-witted one, didn't recognize Your feet. You are indeed Narayana; You are the incarnation, O Shri Guru-Murti."
अर्थ: "मी मतिमंद होतो, आपले महत्त्व जाणले नाही. आपण साक्षात नारायण आहात."
Ovi 107: तूंचि विश्वाचा तारक । धरोनियां नरवेष । त्रयमूर्ति तूंचि एक । परब्रह्म श्रीगुरुनाथा ॥ १०७ ॥
Transliteration: Tūñci viśvācā tāraka | Dharōniyā naravēṣa | Trayamūrti tūñci ēka | Parabrahma śrīgurunāthā || 107 ||
Meaning: "You are the savior of the universe, appearing in human form. You are the Trinity in one, Supreme Brahman Shri Guru-Natha."
अर्थ: "आपण मानवी वेष धारण केलेले साक्षात परब्रह्म आहात."
Ovi 108: दिवांध नेणती तुज लोक । तूंचि विश्वाचा पाळक । मी किंकर तुझा सेवक । संसार-धुरंधरीं तारीं मज ॥ १०८ ॥
Transliteration: Divāndha nēṇatī tuja lōka | Tūñci viśvācā pāḷaka | Mī kiṅkara tujhā sēvaka | Saṁsāra-dhurandharīṁ tārīṁ maja || 108 ||
Meaning: "Blind people do not know You. You are the sustainer of the universe. I am Your humble servant; save me from worldliness."
अर्थ: "अज्ञानी लोकांना आपले स्वरूप समजत नाही. मी आपला दास आहे, मला या संसारातून सोडवा."
Ovi 109: ऐसें नानापरी स्तोत्र । करीतसे नंदीनामा पवित्र । जन पाहताति विचित्र । त्यांसी म्हणे नंदीनामा ॥ १०९ ॥
Transliteration: Aisēṁ nānāparī stōtra | Karītasē nandīnāmā pavitra | Jana pāhatāti vicitra | Tyānsī mhaṇē nandīnāmā || 109 ||
Meaning: Thus Nandi performed various holy praises. People watched in wonder as Nandi addressed them.
अर्थ: नंदीने अशा प्रकारे श्रीगुरूंची स्तुती केली. जमलेले लोक हे नवल पाहून थक्क झाले, तेव्हा नंदी लोकांना उद्देशून म्हणाला—
Ovi 110: ऐका हो जन समस्त । श्रीगुरू जाणा परब्रह्मवस्तु । आपण पाप केलें बहुत । दर्शनमात्रें सर्व गेलें ॥ ११० ॥
Transliteration: Aikā hō jana samasta | Śrīgūrū jāṇā parabrahma vastu | Āpaṇa pāpa kēlēṁ bahuta | Darśanamātrēṁ sarva gēlē || 110 ||
Meaning: "Listen, all people! Know Shri Guru as the Supreme Brahman. I had committed many sins, but all vanished at His sight."
अर्थ: "हे लोकांनो ऐका, श्रीगुरु हे साक्षात परब्रह्म आहेत. माझे डोंगराएवढे पाप केवळ त्यांच्या दर्शनाने नष्ट झाले आहे."
Ovi 111: जैसें तृणाचे बणवीसी । अग्नि लागतां क्षणें कैसी । गुरुकृपा होय ज्यासी । पाप जळे तयापरी ॥ १११ ॥
Transliteration: Jaisēṁ tr̥ṇācē baṇavīsī | Agni lāgatāṁ kṣaṇē kaisī | Gurukr̥pā hōya jyāsī | Pāpa jaḷē tayāparī || 111 ||
Meaning: "Just as a fire instantly burns a heap of grass, so does the Guru's grace burn away all sins."
अर्थ: "जसा गवताच्या ढिगाऱ्याला अग्नीचा एक कण लावला तरी तो जळून खाक होतो, तशी गुरूंच्या कृपेने सर्व पापे जळून जातात."
Ovi 112: ‘चरणं पवित्रं विततं पुराणं’ । ऐसें बोले वेद आपण । सेवा सेवा हो गुरुचरण । गुरुवेगळा देव नाहीं ॥ ११२ ॥
Transliteration: ‘Caraṇaṁ pavitraṁ vitataṁ purāṇaṁ’ | Aisē bōlē vēda āpaṇa | Sēvā sēvā hō gurucaraṇa | Guruvēgaḷā dēva nāhī || 112 ||
Meaning: "The Vedas say 'The feet are holy, expansive, and ancient'. Serve the Guru's feet; there is no God besides the Guru."
अर्थ: "वेदांनीही सांगितले आहे की गुरूंचे चरण सर्वात पवित्र आहेत. गुरूशिवाय दुसरा देव नाही, त्यांची सेवा करा."
Ovi 113: ब्रह्मदेवें आपण देखा । दुष्टाक्षरें लिहिलीं कपाळिका । तैसेही होय निका । श्रीगुरुचरणीं लागतां ॥ ११३ ॥
Transliteration: Brahmadēvēṁ āpaṇa dēkhā | Duṣṭākṣarēṁ lihalīṁ kapāḷikā | Taisēhī hōya nikā | Śrīgūrucaraṇīṁ lāgatāṁ || 113 ||
Meaning: "Even if Lord Brahma has written misfortune on the forehead, it can be corrected by surrendering to Shri Guru's feet."
अर्थ: "ब्रह्मदेवाने कपाळावर जरी वाईट नशीब लिहिले असले, तरी गुरूंच्या चरणी लागल्यावर तेही बदलता येते."
Ovi 114: जवळी असतां निधान । कां नोळखा हो तुम्ही जन । नृसिंहसरस्वती कामधेनु । भजा भजा हो सकळिक ॥ ११४ ॥
Transliteration: Javaḷī asatāṁ nidhāna | Kāṁ nōḷakhā hō tumhī jana | Nr̥siṁhasarasvatī kāmadhēnu | Bhajā bhajā hō sakaḷika || 114 ||
Meaning: "When the treasure is near, why don't you recognize it? Narasimha Saraswati is the wish-fulfilling cow; worship Him, everyone!"
अर्थ: "तुमच्या जवळ साक्षात ईश्वर असताना तुम्ही त्यांना का ओळखत नाही? श्रीनृसिंह सरस्वती हे आपल्यासाठी कामधेनू आहेत."
Ovi 115: इहसौख्य ज्ञान ऐका । अंतीं पावे वैकुंठलोका । संदेह नाहीं होईल सुखा । सत्य जाणा हो बोल माझा ॥ ११५ ॥
Transliteration: Ihasaukhya jñāna aikā | Antīṁ pāvē vaikuṇṭhalōkā | Sandēha nāhī hōīla sukhā | Satya jāṇā hō bōla mājhā || 115 ||
Meaning: "Listen: worldly happiness and knowledge follow, and finally one reaches Vaikuntha. There's no doubt happiness will come; know my words as true."
अर्थ: "त्यांच्या भक्तीने या लोकात सुख मिळेल आणि मृत्यूनंतर वैकुंठ मिळेल, हे माझे शब्द सत्य समजा."
Ovi 116: नंदीनामा स्तोत्र करितां । श्रीगुरु संतोषी अत्यंता । भक्तांसी ऐसा निरोप देत । ‘कवीश्वर’ म्हणा यासी ॥ ११६ ॥
Transliteration: Nandīnāmā stōtra karitāṁ | Śrīgūru santōṣī atyantā | Bhaktānsī aisā nirōpa dēta | ‘Kavīśvara’ mhaṇā yāsī || 116 ||
Meaning: While Nandi praised, Shri Guru was greatly pleased. He told the devotees, "Call him 'Kavishwar' (Lord of Poets)."
अर्थ: नंदीची स्तुती ऐकून श्रीगुरु अत्यंत प्रसन्न झाले. त्यांनी सर्वांना सांगितले की, "आजपासून याला 'कवीश्वर' म्हणा."
Ovi 117: कवि ‘बसवरस’ नाम तयासी । निर्धार केला आम्हीं भरंवसीं । ऐसें कृपेनें बोलती त्यासी । ऐकोनि चरणीं लागला ॥ ११७ ॥
Transliteration: Kavi ‘basavarasa’ nāma tayāsī | Nirdhāra kēlā āmhīṁ bharavasīṁ | Aisēṁ kr̥pēnēṁ bōlatī tyāsī | Aikōni caraṇīṁ lāgalā || 117 ||
Meaning: "He is named 'Basavarasa Poet', We have decided with certainty." Hearing this kind blessing, he fell at His feet.
अर्थ: श्रीगुरूंनी त्याला 'बसवरस' असे नाव दिले. कवीश्वर आनंदाने पुन्हा चरणी लागला.
Ovi 118: जें कां शेष होतें जंघेवरी । तें तात्काळ गेलें दूरी । नंदीनामा आनंद करी । राहिला सेवा करीत देखा ॥ ११८ ॥
Transliteration: Jēṁ kā śēṣa hōtēṁ jaṅghēvarī | Tēṁ tātkāḷa gēlē dūrī | Nandīnāmā ānanda karī | Rāhilā sēvā karīta dēkhā || 118 ||
Meaning: The remaining spot on the thigh vanished instantly. Nandi rejoiced and stayed back serving the Guru.
अर्थ: मांडीवर जो छोटासा डाग शिल्लक होता, तो या स्तुतीमुळे तत्काळ नष्ट झाला. तो पूर्णपणे बरा होऊन गुरूंच्या सेवेत राहिला.
Ovi 119: सिद्ध म्हणे नामधारकासी । श्रीगुरुचरित्र ऐसें परियेसीं । कथा करीत कवि बसवरसी । श्रीगुरुसेवेसी राहिला ॥ ११९ ॥
Transliteration: Siddha mhaṇē nāmadhārakāsī | Śrīgūrucaritra aisēṁ pariyēsīṁ | Kathā karīta kavi basavarasī | Śrīgūrūsēvēsī rāhilā || 119 ||
Meaning: Siddha said to Namdharak, "Listen to the Guru Charitra thus. Basavarasa Poet, narrating stories, remained in Guru's service."
अर्थ: सिद्धमुनी म्हणाले, "अशा प्रकारे श्रीगुरूंचा महिमा आहे. तो कवी बसवरस कायमचा गुरूंच्या सेवेत रमला."
Ovi 120: नामधारक म्हणे सिद्धमुनि । दुसरा कवि ‘नरहरि’ म्हणोनि । तो केवीं झाला शिष्य सुगुणी । कवेश्वर भक्त जाहला ॥ १२० ॥
Transliteration: Nāmadhāraka mhaṇē siddhamuni | Dusarā kavi ‘narahari’ mhaṇōni | Tō kēvīṁ jhālā śiṣya suguṇī | Kavēśvara bhakta jāhalā || 120 ||
Meaning: Namdharak asked Siddha Muni, "How did the other poet named 'Narhari' become a virtuous disciple and a poet-devotee?"
अर्थ: नामधारकाने विचारले, "स्वामी, मग दुसरा जो 'नरहरी' नावाचा कवी होता, तो गुरूंचा शिष्य कसा झाला?"
Ovi 121: तें विस्तारोनि आम्हांसी । सांगा स्वामी कृपेंसी । वांछा असे मानसीं । गुरुचरित्र ऐकावे ॥ १२१ ॥
Transliteration: Tēṁ vistārōni āmhānsī | Sāṅgā svāmī kr̥pēnsī | Vāñchā asē mānasīṁ | Gurucharitra aikāvē || 121 ||
Meaning: "Please tell me that in detail with mercy. There is a deep desire in my heart to hear Guru Charitra."
अर्थ: "ती कथाही मला विस्ताराने सांगा. मला गुरुचरित्र ऐकण्याची खूप ओढ लागली आहे."
Ovi 122: म्हणे सरस्वती-गंगाधर । पुढील कथेचा विस्तार । ऐकतां होय मनोहर । नामस्मरण कामधेनु ॥ १२२ ॥
Transliteration: Mhaṇē sarasvatī-gaṅgādhara | Puḍhila kathēcā vistāra | Aikatāṁ hōya manōhara | Nāmasmaraṇa kāmadhēnu || 122 ||
Meaning: Saraswati Gangadhar says that the expansion of the next story is very captivating. Chanting the name is a wish-fulfilling cow.
अर्थ: सरस्वती गंगाधर म्हणतात, पुढील कथेचा विस्तार अत्यंत मनोहर आहे, जो भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करणारा आहे.
Iti Shrigurucharitraparmakathakalpatarau Shrinrusinhasaraswatyupakhyane Siddhanamadharakasamvade Dwijakushatpriharo Nama Catuscatvarinso-Adhyayah ||122|| 🙏🙇🏻
Shri GurudattatreyaarpIntroduction
Conclusion
The conclusion of Chapter 44 marks more than just the physical healing of a devotee; it signifies the spiritual rebirth of a soul. Nandi the patient becomes 'Kavishwar' the poet, proving that Shri Guru does not just remove suffering but also awakens the dormant potential within us.
The lingering spot on Nandi’s thigh serves as a permanent reminder for all seekers: even a grain of doubt can hinder complete realization. However, the subsequent clearing of that spot through the composition of hymns teaches us that sincere praise and 'Bhakti' can override the darkest of karmas. As we close this chapter, let us carry the conviction that Shri Guru is the 'Kamadhenu' (wish-fulfilling cow) of the modern age, ever-ready to protect those who surrender with a pure heart.
Note: This is an English translation and transliteration of the original 16th-century classic by Saraswati Gangadhar, meticulously prepared for global devotees of Lord Dattatreya by Mantra Stotra Jyoti With Marathi Ovi Meaning & EnglishTransliteration & Ovi
⭐ ⭐ ⭐
