"अक्षय्य तृतीया २०२५: पूजा विधी, शुभ मुहूर्त आणि दानाचे महत्त्व"

अक्षय तृतीया सोने खरेदी मुहूर्त 2025

![]() |
| अक्षय तृतीया मुहूर्त 2025 |
अक्षय्य तृतीयेचे महत्त्व
पौराणिक ग्रंथांनुसार, अक्षय्य तृतीयेच्या दिवशीच श्री विष्णूंचा सहाव्या परशुराम आणि नर नारायण अवतार धारण केला होता, तसेच या दिवशी देवी गंगादेखील पृथ्वीवर अवतरली होती. याच दिवसापासून सतयुग, द्वापारयुग व त्रेतायुगाच्या सुरुवातीची गणना केली जाते. पित्रांच्या संबंधित असलेले कोणतेही काम करायचे असेल तर अक्षय तृतीयापेक्षा चांगला दिवस असू शकत नाही. या दिवशी पिंडदान केल्यास पित्रांना मोक्ष प्राप्त होते. त्याच दिवशी भगवान गणेश आणि ऋषिवेद व्यास यांनी महाभारत लिहिण्यास सुरुवात केली होती. अक्षय हा एक संस्कृत शब्द आहे याचा अर्थ म्हणजे अनंत किंवा अंतहीन आहे. या कारणास्तव हा दिवस लोकांसाठी असेन शुभेच्छा घेऊन येतो म्हणूनच या दिवशी सर्व नवीन प्रकल्प सुरू करण्याचा प्रयत्न करतात. सोन्या चांदीचे दागिने घरातील मौलवान वस्तू धातू वाहन व शुभकार्य सुद्धा याच दिवशी करतात.
अक्षय्य तृतीयेचा पूजा विधी
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी पहाटे उठून, स्नानादी कर्मे करावीत. त्यानंतर घर स्वच्छ करून श्री विष्णू आणि देवी लक्ष्मीच्या मूर्ती किंवा फोटोची पूजा करावी. श्री विष्णूला चंदन, पिवळे फूल आणि देवी लक्ष्मीला कुंकू, गुलाब, मोगरा, कमळ अर्पण करावे. सुका मेवा, खीर, बत्तासे, गूळ, आंबा, यांचा नैवेद्य अर्पण केल्यानंतर श्री विष्णू आणि देवी लक्ष्मीची स्तोत्र, मंत्राने मनोभावे आराधना करावी. त्यानंतर आरती करून पूजा संपन्न करावी. या दिवशी गरीब, गरजू व्यक्तीला दान करावे. अक्षय्य तृतीयेला केल्या जाणाऱ्या दान, मंत्र, जप, यज्ञातून मिळणारे पुण्य अक्षय असते; जे व्यक्तीच्या आयुष्यात सुख-समृद्धी घेऊन येते.
अक्षय्य तृतीयेची तिथी
२९ एप्रिल रोजी संध्याकाळी ५ वाजून ३१ मिनिटांनी सुरू होऊन ३० एप्रिल रोजी दुपारी २ वाजून १२ मिनिटांनी असेल. उदय तिथीनुसार ३० एप्रिल (बुधवार) रोजी अक्षय्य तृतीयेचा सण साजरा केला जाईल.
अक्षय्य तृतीयेच्या पूजेचा शुभ मुहूर्त
बुधवार, ३० एप्रिल रोजी पहाटे ५ वाजून ३१ मिनिटांपासून अक्षय्य तृतीयेच्या पूजेचा शुभ मुहूर्त सुरू होईल आणि तो दुपारी १२ वाजून १८ मिनिटांपर्यंत असेल.
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करण्याचा शुभ मुहूर्त
![]() |
| Akshay tritiya in Marathi |
३० एप्रिल रोजी सकाळी ५ वाजून ४१ मिनिटांपासून ते दुपारी २ वाजून १२ मिनिटांपर्यंत असेल. तसेच तुम्ही जर सोने-चांदीची खरेदी करू शकत नसाल, तर अक्षय्य तृतीतीयाला तुम्ही माती, पितळेची भांडी, शेगडी, किंवा पिवळी मोहरी, सेंधव मीठ/खडे मीठ, मातीचा पाण्याचा माठ, देखील खरेदी करू शकता.
अक्षय्य तृतीयेला ह्या ५ वस्तू दान कराव्यात ते जाणून घेऊया.
- अन्नदान: अक्षय्य तृतीयेला धान्य दान करणे हे खूप...
अक्षय तृतीयाचे अन्नदान
पुण्याचे मानले जाते. पौराणिक कथांनुसार ज्या व्यक्तीने त्याच्या आयुष्यात अन्नदान केले त्याला स्वर्गलोकाचीच नव्हे तर मोक्ष प्राप्ती मिळाली असे उल्लेख आहेत. त्यामुळे अन्नदानाला अतिशय महत्त्व आहे. धान्यामधील, गहू, चणे, सातू, तांदूळ, फळे, आणि ....अक्षय तृतीया अन्नदान 2025
इतर धान्य दान करावे. - गूळ: शास्त्रांनुसार, गूळ दान केल्याने व्यक्तीचे नशीब उज्ज्वल होते. कारण सूर्यदेवाच्या कृपेने जीवन उजळून निघते.
- जलदान: पाण्याला जीवन म्हणतात. अक्षय्य तृतीया हा सण ऐन उन्हाळ्यात येत असल्याने मनुष्य असो वा प्राणी, पक्षी पाण्याने प्रत्येक जीव व्याकुळ होतोच म्हणून अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने तुम्ही मातीच्या भांड्यात पाणी भरून ते पात्र गरजूंना दान करू शकता किंवा...
अक्षय तृतीया दान 2025
पाणपोई उभारू शकता. - खडे मीठ: अक्षय्य तृतीयेला सैंधव मीठ दान केल्याने पुण्य मिळते. मीठ समुद्रातून मिळते, म्हणून मीठ देवी लक्ष्मीशी देखील संबंधित आहे. मीठ हा अन्नपदार्थातला महत्त्वाचा घटक आहे. यासाठी मीठाचे दान करावे.
- वस्त्रदान: अक्षय्य तृतीतीयाला वस्त्र दान करणे देखील खूप शुभ मानले जाते. एखाद्या गरजू व्यक्तीला पिवळ्या रंगाचे वस्त्र दान करावे पिवळा रंगाच्या वस्त्र दान केल्याने सोने दान केल्याचे फळ मिळते.

