धनत्रयोदशी / धन्वंतरी पूजा — महत्त्व, विधी, मुहूर्त व मंत्र
असं धनतेरस, किंवा धनत्रयोदशी ही आश्विन महिन्याच्या १३ व्या दिवशी असते. या दिवशी देवांचा वैद्य धन्वंतरी याचा जन्म झाला. म्हणून या दिवशी धन्वंतरीची पूजा करतात. काही लोक या दिवशी लक्ष्मी मातेची पूजा करतात. दिवाळी सण असताना धनत्रयोदशीस एक आगळेवेगळे स्वरूप येते. व्यापारी वर्गात या पूजेचे महत्त्व विशेष असते. या दिवशी संध्याकाळी दुकानांमध्ये पूजा केली जाते. हिशेबाच्या नव्या वह्यांचा वापर या दिवसापासून सुरू करण्याचा प्रघात आहे. (लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मुख्यत: धनाची आणि कुबेराची पूजा केली जाते.
भारतीय संस्कृतीत आरोग्याला अधिक महत्त्व दिले जाते. आरोग्याला संपत्तीसोबतचे स्थान दिल्यामुळे नेहमी आरोग्य धनसंपदा असे म्हटले जाते. त्यामुळे दिवाळीत धनत्रयोदशीला महत्त्व देण्यात आले आहे., माहिती, धन्वंतरी पूजा मंत्र- विधी, धनत्रयोदशी पूजा विधी -मंत्र, यमादीप दान मंत्र, धनत्रयोदशीची तिथी आणि मुहूर्त ,जाणून घेऊया याबद्दल
धन्वंतरीची पौराणिक कथा
पौराणिक कथेनुसार धन्वंतरी हा भगवान विष्णूचा अवतार मानण्यात आला आहे. असे म्हटले जाते की, समुद्रमंथनाच्या वेळी तो अमृताचा घागर घेऊन समुद्रात बाहेर पडला होता. धन्वंतरी ही देवता म्हणून पूजली जाते. यामुळे आरोग्य, औषधाचे ज्ञान आणि दीर्घायुष्य प्रदान करते. प्राचीन काळात वैद्यकशास्त्र, आयुर्वेदाशी संबंध जोडण्यात आल्यामुळे त्यांना आयुर्वेदाचे जनक म्हणून ओळखले जाते.
पुराणात असे म्हटले जाते की, धन्वतंरी यांची उत्पत्ती समुद्रमंथनाशी संबंधित आहे. यामध्ये देव आणि दानवांशी विविध दैवी शक्ती प्राप्त करण्यासाठी समुद्र मंथन केले. समुद्रमंथनाच्या वेळी यातून अनेक गोष्टी बाहेर आल्या आणि त्यातून धन्वंतरीही एका हातात अमृताचे भांडे आणि दुसऱ्या हातात औषधी वनस्पती घेऊन समुद्रातून बाहेरआले असे म्हटले जाते की, धन्वतंरी देव जे अमृताचे भांडे घेऊन आले होते त्याची मागणी देव आणि दानवांनी केली होती कारण त्यावेळी ते अमरत्वाचे वरदान देऊ शकते. भगवान धन्वंतरीचा अवतार आयुर्वेदाच्या सुरुवातीशी जोडलेला आहे. कारण त्यांनी यावेळी अनेक औषधांचे ज्ञान दिले. यामागे शरीर, मन आणि आत्मा यांचा समतोल साधून रोग टाळणे किंवा बरा करणे असा त्याचा उद्देश आहे.
![]() |
| Image from -social media |
धन्वंतरीची पूजा करण्याचे महत्त्व
दिवाळीचा सण हा पाच दिवसांचा असतो. या काळात धनत्रयोदशीचा सण भगवान धन्वंतरीचा दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवशी भगवान धन्वंतरीची विशेष पूजा केली जाते. धनत्रयोदशीला धन्वंतरी त्रयोदशी असेही म्हणतात. हा सण देवाकडून आरोग्य, संपत्ती आणि समृद्धीचा आशीर्वाद मिळविण्याचा शुभ काळ मानला जातो. या दिवशी धन्वंतरीची पूजा केल्याने वर्षभर आरोग्य चांगले राहते. तसेच अनेक रोगांपासून मुक्ती मिळते. भगवान धन्वंतरीची पूजा केल्याने जीवनात सकारात्मक ऊर्जा मिळते. असे मानले जाते की भगवान धन्वंतरीचा जन्म समुद्रमंथनातून आयुर्वेदिक औषधी वाढवण्यासाठी झाला होता, म्हणूनच धनत्रयोदशीला त्यांची पूजा करण्याची परंपरा आहे.
धनत्रयोदशीला सोनं खरेदीला महत्त्व का?
धनत्रयोदशी हा साडेतीन मुहूर्तापैकी एक असल्याने यादिवशी सोनं खरेदीला अतिशय महत्त्व आहे. सोने, चांदी, पितळ, फुले, पितळ किंवा तांब्यापासून बनवलेल्या वस्तू खरेदी करणे शुभ मानलं जातं. या दिवशी योग्य वस्तू खरेदी करणे आणि अशुभ गोष्टींपासून दूर राहिल्यास घरात सुख समृद्धी नांदेत असा विश्वास आहे.
१८ ऑक्टोबर २०२५ ला दुपारी १२.१८ मिनिटांपासून १९ ऑक्टोबर ला दुपारी १.५१मिनिटांपर्यंत आहे. उदयतिथीनुसार, धनत्रयोदशी १८ ऑक्टोबरला साजरी करण्यात येईल.
धनत्रयोदशी पूजा शुभ मुहूर्त
धनत्रयोदशीचा मुहूर्त हा विधी आणि पूजा करण्यासाठी एक महत्त्वाचा काळ मानला जातो. पंचांगानुसार, यंदा पूजेचा शुभ मुहूर्त १८ ऑक्टोबरला पूजा मुहूर्त
आणि
रा.१०.०० ते उ.रा.१२.३०
यमादीपदानाची वेळ
धनत्रयोदशीला यमदीपक लावण्याची परंपरा आहे. हा दिवा १८ ऑक्टोंबर रोजी-संध्याकाळी ०६:१० पासून संध्याकाळी ०७:२४
धनत्रयोदशी गणेश पूजा विधी
जिथे लक्ष्मीची पूजा केली जाते, तिथे गणेशपूजा आवश्यक असते, तरच फळ मिळते. धनत्रयोदशीच्या दिवशी गणेशाला शुभ मुहूर्तावर स्नान करावे. दिवा लावल्यानंतर गणपतीला गेनू, दुर्वा, चंदन, कुमकुम, मोली, लाल वस्त्र, लाल फुले, लाडू किंवा मोदक अर्पण करावेत.
धनत्रयोदशी कुबेर पूजन पद्धत
ज्याप्रमाणे लक्ष्मी ही संपत्तीची देवी आहे, त्याचप्रमाणे कुबेर देवता ही संपत्तीचा राजा मानली जाते. धनत्रयोदशीला कुबेर देवतेचे चित्र स्थापित करून रोळी, हळद, अक्षत, फुले, नैवेद्य, फळे अर्पण करून या मंत्राचा जप करावा. या पद्धतीची पूजा केल्याने पद, प्रतिष्ठा, ऐश्वर्य आणि ऐश्वर्य प्राप्त होते असे मानलं जातं.
भगवान धन्वंतरि मंत्र
म्हणजेच परमदेव, ज्याला सुदर्शन वासुदेव धन्वंतरी म्हणतो, जो अमृताचे भांडे धारण करतो, जो सर्व भयांचा नाश करतो, सर्व रोगांचा नाश करतो, तो तिन्ही लोकांचा स्वामी आहे आणि त्यांचा पालनकर्ता आहे; त्या विष्णुरूप धन्वंतरीला माझा प्रणाम.
यमादीपदान मंत्र
(या दीपदानाने यमदेव प्रसन्न होवो.) वर्णन असावा
टीप: हा लेख पंडित्यपूर्ण पारंपारिक माहितीवर आधारित आहे. स्थानिक रीतिरिवाज आणि स्थानिक पंचांगानुसार तिथी/मुहूर्त थोडेफार बदलू शकतात — त्यामुळे नित्य पूजा/मुहूर्तासाठी स्थानिक पंचांग किंवा ज्योतिषाशी पुष्टी करावी.

.jpeg)