गुरुपौर्णिमा २०२५: श्री गुरुचरित्र साप्ताह पारायण
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः
गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः॥
गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः॥
श्री गुरुचरित्र हा ग्रंथ दत्त संप्रदायातील अत्यंत पूजनीय असा ग्रंथ असून, १४व्या शतकातील श्री नृसिंहसरस्वती यांचे अद्भुत चरित्र त्यात वर्णिलेले आहे. त्यांचे शिष्य श्रीसरस्वती गंगाधर यांनी १५व्या शतकात या ग्रंथाची रचना केली.
श्री गुरुचरित्राचे स्वरूप
या ग्रंथात ५२ अध्याय (काही आवृत्त्यांमध्ये ५३) व सुमारे ७४९१ ओव्या आहेत. ग्रंथ तीन भागांत विभागलेला आहे:
- ज्ञानकांड
- कर्मकांड
- भक्तिकांड
श्रीपाद श्रीवल्लभ व नृसिंहसरस्वती यांच्या लीलांचे व उपदेशांचे वर्णन आहे. या ग्रंथाला ‘पाचवा वेद’ असेही मानले जाते.
गुरुपौर्णिमा तिथी व वेळा (२०२५)
- सुरुवात: ९ जुलै २०२५ रोजी रात्री १:३६ वाजता
- समाप्ती: १० जुलै २०२५ रोजी रात्री २:०६ वाजता
- मुख्य दिवस: गुरुवार, १० जुलै २०२५
![]() |
| Image from -social media |
पारायणपूर्वी तयारी
- दत्तगुरूंची मूर्ती किंवा फोटो स्वच्छ चौरंगावर स्थापना करा.
- त्यावर शुभ्र वस्त्र अंथरावे.
- सप्ताह संकल्प करून श्रीगुरूंना साकडे घालावे.
- सुरुवातीला गणपतीचे पूजन करावे.
- दररोज पिवळी फुले व मिठाई अर्पण करावी.
- शेवटी हळदी-चंदनाचे, वस्त्र किंवा दत्ताशी संबंधित वस्तूंचे दान करावे.
गुरुचरित्र पारायणाचे नियम
- गाय मातेला अन्नदान करावे, शक्य असल्यास दररोज.
- दररोज गायत्री मंत्राची एक माळ व गणपती अथर्वशीर्ष पठण करावे.
- वाचन वेळ: पहाटे ३ ते संध्याकाळी ४ दरम्यान. दुपारी १२–१२.३० ला वाचन न करणे.
- सूतक, अंत्यविधी अशा घरांना टाळावे.
- स्वतःकडे सूतक असल्यास इतरांकडून वाचन पूर्ण करवून घ्यावे.
- दररोज धूप, दीप, नैवेद्य व आरती करावी.
- संध्याकाळी विष्णु सहस्रनाम पठण करावे (शक्य असल्यास).
- पूर्व किंवा उत्तराभिमुख बसून वाचन करावे.
- निश्चित जागा, दिशा आणि वेळ ठरवून ठेवावी.
- अखंड नंदादीप तेवत ठेवावा व रांगोळी काढावी.
- एक मोकळा पाट गुरुंसाठी ठेवावा — श्रद्धेनुसार ते फेरी मारतात.
- रात्रीही आरती करावी.
- सोवळ्याने, शुद्ध मनाने वाचन करावे.
- वाचनादरम्यान उठू नये, किंवा बोलू नये.
- उच्चार स्पष्ट व श्रवणीय असावेत — मनोभाव महत्वाचा.
शेवटचे स्तोत्र
॥ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ॥
॥ दत्त दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा, नृसिंह सरस्वती दिगंबरा ॥
॥ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ॥
॥ दत्त दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा, नृसिंह सरस्वती दिगंबरा ॥
॥ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ॥
.jpeg)