वृषभ राशी नक्षत्रानुसार विष्णुसहस्रनाम श्लोक | Krttika, Rohini, Mrugashira चरण मंत्र

वृषभ राशीसाठी विष्णुसहस्रनामाचे शुभ श्लोक

वेदांतील श्रेष्ठ ग्रंथांमध्ये समाविष्ट असलेले विष्णुसहस्रनाम हे भगवान विष्णूंच्या सहस्त्र नामांचे स्तोत्र आहे. हे नामस्मरण केल्याने मन, शरीर आणि आत्म्याला शांती लाभते, तसेच अनेक दोष, अडथळे व संकटे दूर होतात, असे मानले जाते.

वृषभ राशीसाठी विष्णुसहस्रनाम श्लोक - कृतिका, रोहिणी, मृगशिरा नक्षत्र मंत्र
Image from:- Pinterest


विष्णुसहस्रनाम हे भगवान विष्णूंचे हजार पवित्र नाम असलेले स्तोत्र आहे. यामध्ये प्रत्येक नावात दैवी ऊर्जा आणि कल्याणकारी शक्ती आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक व्यक्तीच्या जन्मवेळी असलेल्या राशी, नक्षत्र व त्यातील चरणांनुसार काही विशिष्ट नामे किंवा श्लोक अत्यंत प्रभावी मानले जातात.

प्रत्येक चरणासाठी विष्णुसहस्रनामातील एक श्लोक निवडलेला असून, त्या श्लोकाचे स्मरण किंवा जप नियमित केल्यास मानसिक समाधान, आरोग्य लाभ व अध्यात्मिक स्थैर्य मिळते, चरण व नक्षत्र दोष दूर होतात असे शास्त्र सांगते. हे श्लोक नियमित वाचनासाठी, जपासाठी किंवा ध्यानात उपयोगी आहेत.

या लेखात आम्ही वृषभ राशीतील खालील नक्षत्र व त्यांच्या प्रत्येक चरणानुसार योग्य श्लोक दिले आहेत:

जर तुमची चंद्र रास वृषभ असेल, आणि नक्षत्र कृतिका, रोहिणी आणि मृगशिरा पैकी कोणतेही असेल, तर खालील श्लोक तुमच्या चरणाप्रमाणे वाचा व जपा.


YouTube Video Link 👇👇For Mantra 

https://youtu.be/6M-0dx4MimU?si=FoZfMoQEuVq3ls0X


रास : वृषभ, नक्षत्र : कृतिका, चरण : द्वितीय
सुरेशः शरण शर्म विश्वरेताः प्रजाभवः ।
अहः संवत्सरो व्यालः प्रत्ययः सर्वदर्शनः ॥१०॥
रास : वृषभ, नक्षत्र : कृतिका, चरण : तृतीय
अजः सर्वेश्वरः सिद्धः सिद्धिः सर्वादरच्युतः ।
वृषाकपिरमेयात्मा सर्वयोगाविनिःसृतः ॥११॥
रास : वृषभ, नक्षत्र : कृतिका, चरण : चतुर्थ
वसुर्वसुमनाः सत्यः समात्मा सम्मितः समः ।
अमोघः पुण्डरीकाक्षो वृषकर्मा वृषाकृतिः ॥१२॥
रास : वृषभ, नक्षत्र : रोहिणी, चरण : प्रथम
रुद्रो बहुशिरा बभ्रुर्विश्वयोनिः शुचिश्रवाः ।
अमृतः शाश्वतः स्थाणूर्वरारोहो महातपाः ॥१३॥
रास : वृषभ, नक्षत्र : रोहिणी, चरण : द्वितीय
सर्वगः सर्वविद्भनुर्विष्वक्सेनो जनार्दनः ।
वेदो वेदविदव्यङ्गो वेदाङ्गो वेदवित्‍कविः ॥१४॥
रास : वृषभ, नक्षत्र : रोहिणी, चरण : तृतीय
लोकाध्यक्षः सुराध्यक्षो धर्माध्यक्षः कृताकृतः ।
चतुरात्मा चतुर्व्युहश्चतुर्दंष्ट्रश्चतुर्भुजः ॥१५॥
रास : वृषभ, नक्षत्र : रोहिणी, चरण : चतुर्थ
भ्राजिष्णुर्भोजनं भोक्ता सहिष्णुर्जगदादिजः ।
अनघो विजयो जेता विश्वयोनिः पुनर्वसुः ॥१६॥
रास : वृषभ, नक्षत्र : मृगशिरा, चरण : प्रथम
उपेन्द्रो वामनः प्रांशुरमोघः शुचिरूर्जितः ।
अतीन्द्रः संग्रहः सर्गो धृतात्मा नियमो यमः॥१७॥
रास : वृषभ, नक्षत्र : मृगशिरा, चरण : द्वितीय
वेद्यो वैद्यः सदायोगी वीरहा माधवो मधुः ।
अतीन्द्रियो महामायो महोत्साहो महाबलः ॥१८॥

वरील श्लोक हे वृषभ राशीतील कृतिका, रोहिणी आणि मृगशिरा नक्षत्रांच्या चरणांनुसार निवडले गेलेले विष्णुसहस्रनामातील विशिष्ट मंत्र आहेत. हे श्लोक दैनंदिन जप, ध्यान, किंवा संकट काळातील मानसिक शांतीसाठी अत्यंत प्रभावी मानले जातात.

आपल्या नक्षत्र व चरणानुसार योग्य श्लोकाचा जप केल्यास, ते आत्मिक स्थैर्य, सकारात्मक ऊर्जा आणि भगवंताची कृपा मिळवण्यास मदत करतात.

आपण हा लेख आपल्या कुटुंबीय व मित्रांशी शेअर करून त्यांनाही या नामस्मरणाचा लाभ देऊ शकता.

Thank You For Valuable Comment

Previous Post Next Post

Contact Form