वसुबारस २०२५ : गोवत्स द्वादशी पूजा, कथा, मुहूर्त व महत्व | Vasubaras 2025 Puja,

 

वसुबारस - गोवत्स द्वादशी

दिवाळीचा आरंभिक सण — गायींची पूजा, मुहूर्त आणि कथा

वसुबारस:-दिवाळीच्या सुरुवातीला या येणाऱ्या दिवसाला खूप महत्त्व दिलेले आहे. भारत हा शेतीप्रधान देश असल्यामुळे या दिवसाला खूप महत्त्व आहे या दिवसापासून आकाश कंदील पण त्या रांगोळ्या काढण्यास सुरुवात होते. या दिवसापासूनच दिवाळीचा पहिला दिवा लावला जातो.गाई आणि वासरू यांची पूजा करून सुखशांती आरोग्यासाठी प्रार्थना करतात. अनेक जण या दिवशी उपवास सुद्धा करतात. ज्यांच्याकडे गायी असतात त्यांच्या घरी पुरणपोळ्यांचा स्वयंपाक केला जातो.

Image from -social media 

गाईचे पाय धुऊन हळद-कुंकू लावून हार घालून पुरणपोळी तिला खायला देऊन गाई आणि वासरू यांची पूजा केली जाते. असे समजले जाते की ही पूजा केल्याने आपल्या मुलाबाळांना चांगले आरोग्य व आयुष्य मिळते. या दिवसाला गोवत्स द्वादशी सुद्धा म्हटले जाते. या दिवसाचे माहिती, कथा व मुहूर्त जाणून घेऊया.

वसुबारस किंवा गोवत्स द्वादशीची कथा समुद्रमंथनाच्या वेळी अमृत सह- नंदा, सुभद्रा, सुरभी, सुशीला आणि बहुला यांच्यासह पाच गाई उत्पन्न झाल्या होत्या. त्यांना लोकमाता म्हटलं गेलं आहे, कारण ते सेवा आणि देवतांच्या संतुष्टीसाठी आल्या. या पाच कामधेनूतून नंदा नावाच्या धेनूला उद्देशित ठेवून हा सण साजरा केला जातो. कामधेनू म्हणजे, शुद्ध पांढरी गाय आहे. देव आणि दानवांमध्ये समुद्रमंथनातून अनेक रत्ने निर्माण झाली, त्यापैकी कामधेनू हे रत्न ही आहे. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी श्री विष्णूंची काही तरंग सक्रिय होऊन ब्रह्मांडात येते आणि या तरंगा विष्णुलोकातील कामधेनू अव‍तरित करते या कारणामुळे गायीची पूजा केली जाते.

मुहूर्त

द्वादशी तिथी सुरू होते -१७ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११:१२
द्वादशी तिथी संपते -१८ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी १२:१८ वाजता
तसेच या दिवशी रमा एकादशी सुद्धा आहे त्याचे तिथी 16 ऑक्टोंबर रोजी सकाळी १०.३६ मि.पासून. ते 17 ऑक्टोंबर रोजी सकाळी ११.१२ मि.पर्यंत आहे.
ह्या दिवशी गाई ची पूजा करताना कामधेनु मंत्राचाही जप करावा त्या व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे ते आवश्यक पाहावी.

  • व्हिडिओ पहा 👇 👇 

गोवत्स द्वादशी विषयी

गोवत्स द्वादशी  रोजी शुक्रवार, १७ ऑक्टोबर २०२५ प्रदोषकाल गोवत्स द्वादशी मुहूर्त -संध्याकाळी ०६:११ तेरात्री ८:३८ कालावधी -०२ तास २८ मिनिटे

Thank You For Valuable Comment

Previous Post Next Post

Contact Form