श्री मल्लारी खंडोबाचे नवरात्र माहिती
म्हाळसापतिं नमस्तुभ्यं मैरालाय नमोनमः ॥
मल्लारिं जगतान्नाथं त्रिपुरारिं जगद्गुरुं ॥
मणिघ्नं म्हाळसाकांतं वंदे अस्मत् कुलदैवतम् ॥
श्री खंडोबा हे महाराष्ट्राचे कुलदैवत आहे. मुख्यत्वे करून महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांत खंडोबाची उपासना जास्त केली जाते. खंडोबाचे नवरात्र हे मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते मार्गशीर्ष शुद्ध षष्टी असे सहा दिवस साजरे केले जाते. या वर्षी २१ नोव्हेंबर ते २६ डिसेंबर २०२५. हा खरा षड्रोत्सव असतो.
मार्गशीर्ष शुद्ध षष्टी म्हणजेच चंपाषष्टी या दिवशी खंडोबा ऋषींच्या विनंतीला मान देऊन मणी-मल्लाचा वध करून लिंगद्वय रूपाने प्रगट झाले.
नवरात्राचे पांच दिवस उपवास करून सहाव्या दिवशी तो सोडतात. सहा दिवस देवापुढे नंदादीप ठेवतात. देवाला बेल, दवणा व झेंडूची फुले फार प्रिय आहेत म्हणून ती आठवणीने वाहतात. खंडोबाच्या उपासनेंत भंडारा फार महत्वाचा आहे.
भंडारा म्हणजे हळदीची पूड.
खंडोबाच्या कुलधर्मासाठी व चंपाषष्टी या दिवशी ठोम्बरा (जोंधळे शिजवून त्यांत दही व मीठ घालतात.), कणकेचा रोडगा, वांग्याचे भरीत, पातीचा कांदा व लसूण हे पदार्थ नैवेद्यांत असतात.
तळी भरण्याचा विधी
ताम्हनात विड्याचे पान, पैसा, सुपारी, भंडारा व खोबरे ठेवून “सदानंदाचा येळकोट” किंवा “एळकोट एळकोट जय मल्हार” म्हणत तीन वेळा उचलतात. नंतर आरती करतात व भंडारा-खोबरे उधळतात.
खंडोबाची पांच प्रतीके
- लिंग – स्वयंभू/अचल/घडीव
- तांदळा – टोकाखाली निमुळते होणारे
- मुखवटे – कापडी/पिटली
- मूर्ती – उभ्या/बैठ्या/घोड्यावर
- टांक – सोने/चांदीवर बनविलेल्या प्रतिमा
सौम्य नवस
- मौल्यवान वस्तू अर्पण
- दीपमाळा बांधणे
- मंदिर बांधणे/जीर्णोद्धार
- पायऱ्या/ओवऱ्या बांधणे
- चौरी ढाळणे
- कावडी
- जागरण/गोंधळ
- वारी मागणे
- तळी भरणे/दहीभात पूजा
- पुरण-वरण-रोडग्याचा नैवेद्य
- कान टोचणे/जावळ/शेंडी
दिन विशेष
रविवार, सोमवती अमावस्या, चैत्री/श्रावणी/माघी पौर्णिमा, चंपाषष्ठी, महाशिवरात्र हे विशेष दिवस मानले जातात.
महाराष्ट्र आणि कर्नाटकातील प्रमुख स्थाने
महाराष्ट्र: जेजुरी, निमगाव, पाली-पेंबर, नळदुर्ग, शेंगुड, सातारे, माळेगाव.
कर्नाटक: मैलारपूर-पेंबर, मंगसुळी, मैलारलिंग, देवरगुडू, मण्मैलार.
खंडोबाची वेशभूषा
पांढरे धोतर, डोक्याला रुमाल, अंगरखा, उपरणे — साधा पण दिव्य वेष.
खंडोबाचे चार हातातील वस्तू
खड्ग, त्रिशूळ, डमरू, रक्तमुण्डयुक्त पानपात्र. जवळ नंदी, घोडा आणि कुत्रा.
उपासना पद्धत
मार्गशीर्ष प्रतिपदेपासून सहा दिवस अखंड ज्योत, रोज पूजा, नैवेद्य, मल्हारी स्तोत्र, विजयग्रंथांचे पठण.
महानैवेद्य
सटीला पुरणपोळी, वांग्याचे भरीत, बाजरीचे रोडगे, दहीभात. ब्राह्मण, सुवासिनी, वाघ्या-मुरळी भोजन.
वारी मागणे
“वारी खंडोबाची” म्हणून पाच घरी ताम्हणासह जाण्याची प्रथा.
दान-धर्म
अन्नदान, पान-विडा, दक्षिणा, कुंकू-अक्षता, देवाची गदा, दिवटी-बुधले विधी.
दिवटी-बुधले महत्व
दैत्यवधानंतर अंधार दूर करण्यासाठी भक्तांनी दिवटी प्रज्वलित केली.
खंडोबाचे नवरात्र – भाग ३
चंपाषष्ठीचा करिती जे करिती कुळधर्म त्याचे होत आहे परिपूर्ण धर्म ॥
चंपाषष्ठी हा श्री मल्लारी-मर्तंडाचा विजय दिवस. देवगणांनी चाफ्याची पुष्पवृष्टी केल्यानेच “चंपाषष्ठी” नाव पडले.
षड्रात्रोत्सव काळात व्रत, उपवास, शुद्ध आचरण, दान, भक्ती—घरातील सर्वांनी पाळावेत.
साहित्य
कुंभ, कलश, विडेपाने, सुपारी, नाणी, धूपदीप, कुंकू, हळद, अक्षता, गुलाल, पंचामृत इत्यादी.
घटस्थापना
सकाळी देवघर स्वच्छ करून माती/भांड्यातील कलशावर नागवेल-पान-नारळ ठेवून घट बसवावा.
अखंड ज्योत नियम
- एक तेल व एक तुपाचा दिवा
- तुपाचा दिवा देवाच्या उजव्या बाजूला
- अखंड दिवा विझल्यास छोट्या दिव्याने पुन्हा प्रज्वलित करणे
- सहा दिवस फुलमाळा, मंत्र-जप, भजन
चंपाषष्ठीचा नैवेद्य
पुरणावरण, वांग्याचे भरीत, रोडगे. तळीभंडार करून घटोत्थापन.
.jpeg)

.jpg)