अधिक मास 2026 : महत्व, तिथी आणि दान
पंचांगानुसार ज्या वर्षी ज्येष्ठ महिना दोनदा येतो त्या वर्षात अधिकमास येतो. अधिकमासाला भगवान विष्णूंचा महिना मानला जातो. या महिन्यात भगवान विष्णूंची पूजा, दान धर्म करण्याला विशेष महत्व प्राप्त आहे. तसेच अधिक महिन्यात काही रितीरिवाज आणि विधी केले जातात. यंदा ज्येष्ठ महिना दोनदा येत असल्याने वर्ष २०२६ मध्ये अधिकमास लागत आहे. जाणून घेऊयात या महिन्याचे महत्व, तिथी आणि तिथीनुसार काय दान करावे.
अधिकमास म्हणजे काय?
अधिकमास म्हणजे एक वाढीव महिना. वर्षात १२ महिने असतात मात्र खगोलीय कारणांमुळे सौर वर्ष जे ३६५ दिवसांचे असते आणि चंद्र वर्ष जे ३५४ दिवसांचे असते यातील ११ दिवसांचा फरक दरवर्षी येतो. सलग तीन वर्षे हा फरक ३३ दिवसांचा म्हणजेच संपूर्ण एक महिन्याचा असतो. त्यामुळे दर तीन वर्षांनी अधिकमास येतो.
अधिकमास आल्यामुळे पंचांगावर परिणाम होऊन वर्षातील सर्व सण काही दिवसांसाठी पुढे जातात. हा महिना जवळपास ३० ते ३३ दिवसांचा असल्याने वर्षातील महिने १३ होतात. यामुळे ज्येष्ठ महिना दोनदा गणला जातो.
अधिकमास धार्मिक महत्व
अधिकमास हा महिना भगवान विष्णूंना समर्पित केलेला आहे. भगवान विष्णू हे पृथ्वीचे पालनहार आहेत. या महिन्यात विष्णूंची भक्ती, उपासना, पूजा व्रत याला अत्यंत महत्व आहे.
जो कोणी अधिकमासात संपूर्णपणे सात्विक भोजन करतो भगवान विष्णूंची आराधना करतो त्यावर कायम विष्णू कृपा करतात अशी मान्यता आहे. तसेच या महिन्यात दान करण्याला देखील पुण्याचे मानले जाते.
“त्रयोदशो मास: इन्द्रस्य गृह:।”
या मासात पूजा-पाठ, धार्मिक कृत्ये, दान धर्म केले असता कायमस्वरूपी दारिद्र्य, दु:ख नष्ट होते आणि व्यक्ती प्रापंचिक दु:खातून तरून जाते.
या मास मध्ये व्रत-वैकल्यांना इतर वेळी केलेल्या व्रतांपेक्षा १० पट अधिक फळ मिळते. आध्यात्मिक उन्नतीसाठी हा महिना अतिशय फलदायी आहे. या मास कोणतीही उपासना मनोभावे केली, तरी कुंडलीतील दोष दूर होतात आणि पुण्य प्राप्त होते.
अधिकमास तारीख 2026
अधिक मास समाप्ती : 15 जून 2026
याचा अर्थ असा आहे की, 2026 मध्ये दोन ज्येष्ठ महिने असणार आहेत. एक असेल नियमित येणारा तर दुसरा असेल अतिरिक्त ज्येष्ठ महिना.
अधिक मासात काय करावे?
- अधिक मासात सर्वार्थसिद्धी योग, द्विपुष्कर योग, अमृतसिद्धी योग जुळून आले आहेत.
- दान-धर्म करून या योगांचा लाभ घ्यावा.
- अधिक महिन्यात धार्मिक विधींना विशेष महत्त्व असते.
- देवापुढे अखंड दीप लावल्यास लक्ष्मीप्राप्ती होते.
- तांबूलदान (विडा-दक्षिणा) करावे.
- महिनाभर तांबूलदान दिल्यास सौभाग्यप्राप्ती होते.
- महिनाभर अन्नदान करावे.
- गोपूजन करावे, गोग्रास घालावा.
- अपूपदान (अनारशांचे दान) करावे.
| तिथी | दान |
|---|---|
| प्रतिपदा | मालपूआ 33 नग |
| द्वितीया | खीर पात्र |
| तृतीया | दही पात्र |
| चतुर्थी | सुती कपडे |
| पंचमी | रेशमी कपडे |
| षष्ठी | ऊनी कपडे |
| सप्तमी | शुद्ध तूप |
| अष्टमी | पांढरे तीळ, गूळ |
| नवमी | तांदूळ |
| दशमी | गहू |
| एकादशी | दूध |
| द्वादशी | खिचडी कच्ची |
| त्रयोदशी | साखर, मध |
| चतुर्दशी | तांब्याचे भांडे |
| पौर्णिमा | चांदीचे नंदी गण |
| तिथी | दान |
|---|---|
| प्रतिपदा | चांदीचा दिवा तुपानी भरलेला |
| द्वितीया | कश्याचे भांडे, सोने |
| तृतीया | कच्चे हरबारे, खायचा चुना |
| चतुर्थी | खारीक |
| पंचमी | तुरीची डाळ, गूळ |
| षष्ठी | रक्त चंदन, कात |
| सप्तमी | कापूर, अत्तर, केवडा |
| अष्टमी | केशर, वेलदोडा, गोड रंग |
| नवमी | कस्तुरी, जवित्री |
| दशमी | गोरोचन, लवंग |
| एकादशी | शंख, देठवाले पान |
| द्वादशी | गरुड घंटी |
| त्रयोदशी | मोती |
| चतुर्दशी | हीरा रत्न |
| अमावश्या | पन्ना रत्न |
