भवान्यष्टकं | श्री आदि शंकराचार्य रचित भवानी अष्टक | मराठी अर्थांसहित

भवान्यष्टकं — श्री आदि शंकराचार्य

मूळ — श्री आदि शंकराचार्य | मराठी अर्थांसहित

न तातो न माता न बन्धुर्न दाता

न पुत्रो न पुत्री न भृत्यो न भर्ता।

न जाया न विद्या न वृत्तिर्ममैव

गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानि ॥1॥

भावार्थ — हे भवानी ! पिता, आई, भाऊ, दाता, पुत्र, कन्या, सेवक, स्वामी, पत्नी, ज्ञान आणि वृत्ती — यापैकी कोणीही माझे नाही; फक्त तूच माझी परम गती आहेस.

भवाब्धावपारे महादुःखभीरुः

पपात प्रकामी प्रलोभी प्रमत्तः।

कुसंसारपाशप्रबद्धः सदाहं

गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानि ॥2॥

भावार्थ — हे भवानी ! मी अथांग भवसागरात अडकलो आहे; भवदुःखाने ग्रस्त आहे; काम, लोभ इत्यादी विकाराने संसारबंघनात आहोत; आता तूच माझी गती आहेस.

न जानामि दानं न च ध्यानयोगं

न जानामि तन्त्रं न च स्तोत्रमन्त्रम्।

न जानामि पूजां न च न्यासयोगम्

गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानि ॥3॥

भावार्थ — हे भवानी ! दान, ध्यान, तंत्र, स्तोत्र, पूजा, न्यास — हे सर्व मला माहित नाही; म्हणून तूच माझी गती आहेस.

न जानामि पुण्यं न जानामि तीर्थं

न जानामि मुक्तिं लयं वा कदाचित्।

न जानामि भक्तिं व्रतं वापि मातर्

गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानि ॥4॥

भावार्थ — हे आई ! पुण्य, तीर्थ, मुक्ती, लय, भक्ती, व्रत — मला ज्ञात नाही; म्हणून तूच माझी परम गती आहेस.

संपूर्ण येथे ऐका 👇 👇 🙇🏻 🙏 

कुकर्मी कुसंगी कुबुद्धिः कुदासः

कुलाचारहीनः कदाचारलीनः।

कुदृष्टिः कुवाक्यप्रबन्धः सदाहम्

गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानि ॥5॥

भावार्थ — मी कुकर्मी, कु-संगतीचा, दुर्बुद्धी, कदाचारयुक्त — असा आहे; त्यामुळे हे भवानि तूच माझी एकमात्र गती आहेस.

प्रजेशं रमेशं महेशं सुरेशं

दिनेशं निशीथेश्वरं वा कदाचित्।

न जानामि चान्यत् सदाहं शरण्ये

गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानि ॥6॥

भावार्थ — मी ब्रह्मा, विष्णु, शिव, इंद्र, सूर्य, चंद्र किंवा इतर कोणताही देव जाणत नाही; हे शरण देणारी भवानी — तूच माझी परम गती आहेस.

विवादे विषादे प्रमादे प्रवासे

जले चानले पर्वते शत्रुमध्ये।

अरण्ये शरण्ये सदा मां प्रपाहि

गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानि ॥7॥

भावार्थ — हे आई ! तू मला विवाद, विषाद, प्रमाद, प्रवास, जळ, अनल, पर्वत, शत्रू, अरण्य अशा सर्व परिस्थितीत नेहमी रक्षण कर.

अनाथो दरिद्रो जरारोगयुक्तो

महाक्षीणदीनः सदा जाड्यवक्त्रः।

विपत्तौ प्रविष्टः प्रणष्टः सदाहं

गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानि ॥8॥

भावार्थ — हे भवानी ! मी अनाथ, दरिद्र, जरा-जीर्ण, रोगी, अतिशय दीन-दुबळा आहे; आता तूच माझी परम गती आहेस.

इति श्री आदि शंकराचार्य विरचितम् भवान्यष्टकं सम्पूर्णम्॥

Thank You For Valuable Comment

Previous Post Next Post

Contact Form