गुरुचरित्र अध्याय फलश्रुती

॥ श्री गुरुचरित्र अध्यायनिहाय फलश्रुती ॥

श्री गुरुदेव दत्त
अध्याय १ ते ५२ संपूर्ण यादी:
  • अध्याय १: नित्य गुरुचिन्तनाने संपूर्ण जीवन मंगलमय होते.
  • अध्याय २: कलीबाधा व सर्व रोगबाधा नाहीशी होतात.
  • अध्याय ३: गुरुकोपाचे शमन होते व व्रताची पूर्तता होते.
  • अध्याय ४: स्त्रीछलणाचा दोष जातो व स्वहिताचे रक्षण होते.
  • अध्याय ५: शाररिक व्यंगे नष्ट होतात. ज्ञानाची प्राप्ती होते.
  • अध्याय ६: दैवी कोप दूर होतो व विद्याप्राप्ती होते.
  • अध्याय ७: पंचमहापापादी सर्व पातके नाहीशी होतात.
  • अध्याय ८: बुध्दिमांद्य नाहिशे होतात. विवाह कार्य सुलभ होते.
  • अध्याय ९: सर्व शुभ कामना गुरुकृपेने पूर्ण होतात.
  • अध्याय १०: नवस फळाला येतात. चोरीचा आळ दूर होतो.
  • अध्याय ११: वाचंदोष तसेच, वेड नाहीसे होते.
  • अध्याय १२: संकटे, दैन्य दारिद्र्य यांचे निवारण होते.
  • अध्याय १३: सर्व प्रकारच्या पोटाच्या व्याधी नाहीशा होतात.
  • अध्याय १४: प्राणघातक गंडातरापासून स्वरक्षण लाभते.
  • अध्याय १५: तिर्थयात्रांना सफलता प्राप्त होते.
  • अध्याय १६: आदरणीयची निंदा, अपमान केल्याचा दोष दूर होतो.
  • अध्याय १७: ज्ञान व गुरुकृपा यांचा लाभ होतो.
  • अध्याय १८: संपत्तीचा लाभ होऊन दारिद्र्य नाहिशे होते.
  • अध्याय १९: भाग्य वृद्धी होते. सद्गुगुरूंचा लाभ होतो. त्रीस्थळी यातरपुण्य लाभते.
  • अध्याय २०: गुरूस्मरण करुनी मनी, पूजा करी वो गुरुचरणी, तुझे पाप होईल धुनी, ब्रह्मासमंध परिहरेल!!
  • अध्याय २१: मृत्यूभयापासून मुक्तता.
  • अध्याय २२: वांझपण दूर होते. बाळणतिनिला चांगले दूध येते.
  • अध्याय २३: पिशाच्चबाधा नष्ट होते. राजमान्यता प्राप्त होते.
  • अध्याय २४: भ्रम व वैचारिक गोंधळ दूर होऊन मनशांती लाभते.
  • अध्याय २५: अपात्र लोकांचा संपर्कात त्यांचे दुष्परिणाम टळतात.
  • अध्याय २६: शत्रू निषभ्रम होऊन शरण होतात.
  • अध्याय २७: गर्व नष्ट होऊन चित्त शुद्ध होते. विद्दानाचा छळ दोषांची निवृत्ती.
  • अध्याय २८: वाईट कर्माचे दोष दूत होतात, सत्पथ सापडतो.
  • अध्याय २९: स्त्रीछलदोष, वासनादोष दूर होऊन पावित्र्य लाभते.
  • अध्याय ३०: कुमारिकांना इच्छित पतीची प्राप्ती होते. सौभाग्य वृद्धी होते.
  • अध्याय ३१: पतीवर येणारे विघ्ने टळतात.
  • अध्याय ३२: वैधव्याचे दुःख टळते अथवा सुसह्य होते.
  • अध्याय ३३: वचनभँग व व्यभिचार दोष दूर होऊन सदगती लाभते.
  • अध्याय ३४: प्राणसंकटाचे निवारण होऊन आयुष्य वृद्धी होते.
  • अध्याय ३५: हरवलेले, नष्ट झालेले पुन्हा प्राप्त होते तूटलेले संबंध जुळतात.
  • अध्याय ३६: चूकीच्या समजुती जाऊन अंतःकरण शुद्ध होते.
  • अध्याय ३७: मूढ बुद्धी नष्ट होऊन योग्य ज्ञान व ब्रह्मा प्राप्ती होते.
  • अध्याय ३८: निदा करणारे शरण येतात, अन्नपूर्णा नित्य प्रसन्न राहते.
  • अध्याय ३९: सद्गुगुरुची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो.
  • अध्याय ४०: कुष्ठरोग नाहीसा होऊन शरीर निकोप होते.
  • अध्याय ४१: सद्गुगुरूंची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो.
  • अध्याय ४२: विद्या व फलाची प्राप्ती होऊन कर्तबगारिला यश येते.
  • अध्याय ४३: गर्व व क्रोध नाहीसा होऊन ऐश्वर्याची प्राप्ती होते.
  • अध्याय ४४: मनातील भ्रम दूर होऊन योग्य मार्ग लाभतो.
  • अध्याय ४५: कुष्ठरोग नाहीसा होतो, गुरुनिष्ठ सफल होते. बुद्धी वाढते.
  • अध्याय ४६: चित्ताची स्थिरता लाभते. ज्ञानाची प्राप्ती होते.
  • अध्याय ४७: पक्षपाताचा दोष नाहीसा होऊन समत्वबुद्धी प्राप्त होते.
  • अध्याय ४८: गुरुनिष्ठास विपुल समृद्धी प्राप्ती होते. विघ्ने टळते.
  • अध्याय ४९: तीर्थक्षेत्राबद्दल आदर वाढतो. सर्व पापांचे शमन होते.
  • अध्याय ५०: ग्रँथी रोग, त्वचारोग नष्ट होऊन शरीरसुख लाभते.
  • अध्याय ५१: सुखसमृद्धी व अंती मोक्ष प्राप्ती होते.
  • अध्याय ५२: श्रद्धेला चांगली फळे येतात व संपूर्ण ग्रंथ वाचनाचे फळ मिळते.

॥ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ॥

Thank You For Valuable Comment

Previous Post Next Post

Contact Form