अधिकमास माहात्म्य अध्याय २९ कदर्य ब्राह्मणाची कथा
![]() |
नारायण नारदाला म्हणाले - "दृढधन्वा वनात गेला तो जाता जाता गंगातीरी पोहोचला. ते स्थान त्याला आवडले. तो पत्नीसह तेथेच राहिला. राजा व राणी तापसी जनांप्रमाणे तेथे कालक्रमणा करू लागले. पुढे अधिकमास आला त्यावेळी राजाने खडतर तपाचरण केले. श्रीकृष्णनामाचा अखंड जप त्याने चालविला. तो एका पायावर उभा राहिला. त्याने उपवास केला. महिनाभर त्या तपोनिष्ठ राजाची सर्व सेवा त्याची पत्नी गुणसुंदरी करीत होती. महिना संपता संपता अचानक एक दिव्य विमान आकाशातून खाली आहे. त्या विमानात दोन तेजस्वी देवदूत होते. एकाचे नाव पुण्यशील व दुसऱ्याचे नाव सुशील. त्यांनी राजा व राणी यांना सन्मानाने विमानात घेतले. ते विमान राजाराणीसह आकाशात उंच उडाले. त्या दोघांचे देह आपोआप दिव्य झाले.
ते विमान श्रीकृष्णाच्या गोलोकात पोहोचले. राजा व राणी यांना श्रीकृष्णाचे सान्निध्य मिळाले. अधिकमासात केलेल्या तपश्चर्येमुळे ते दांपत्य नित्य गोलोकनिवासी झाले. आता जर मी सांगितले की एका वानराचाही अधिक महिन्यात त्याच्याकडून घडलेल्या उपासामुळे व स्नानामुळे उद्धार झाला तर तुला आश्चर्य वाटेल. ती कथा आहेच तशी अद्भुत." नारदाने सर्व कथा सांगण्याची प्रार्थना केली. तेव्हा नारायण ऋषी सांगू लागले -
त्या माळ्याला त्याची दया आली व त्याने त्याला बागेत राहण्यासाठी जागा दिली. कदर्याला फार आनंद झाला. तो बागेत राहू लागला. माळ्याला सर्वतोपरी मदत करून त्याने माळ्याचा विश्वास संपादन केला. माळ्याने बागेची सर्व व्यवस्था त्याच्यावर सोपविली व माळी स्वतः राजाच्या बागकामावर नोकर म्हणून राहायला गेला. स्वतःच्या बागेत येण्यासाठी त्याला फार कमी वेळ मिळे. पण तो कदर्यावर विश्वसून होता. त्याला चिंता नव्हती. कदर्य स्वतः फळे खाई आणि पुष्कळ फळे विकून पैसे मिळवी. ते धन तो भूमीत पुरून ठेवी. एके दिवशी माळ्याला संशय आला. त्याने चौकशी केली. कदर्य चलाख होता. तो म्हणाला - " मी बागेची राखण करतो. पण पुष्कळ पक्षी येतात ते फळे खाऊन टाकतात. त्यातील कित्येक पक्षी मी मारून टाकले." त्यांची प्रेते त्याने दाखविली. त्यांची पिसे व मांसही त्याने दाखविले. त्याने खरोखरच कितीतरी पक्षी मारले होते. माळ्याची खात्री पटली. त्याचा जास्तच विश्वास बसला. त्याने कदर्यावर भार टाकला. सत्त्याऐंशी वर्षांचा होऊन कदर्य मरण पावला. त्याच्या चौर्यकर्माचे फळ म्हणजे नरक यातना. बागेत दुसरे कुणी नसल्यामुळे त्याचे प्रेत तसेच पडून कुजून गेले. तिकडे परलोकात त्याला फार पश्चाताप झाला. आपण कोणतेही पुण्य कृत्य केले नाही याची त्याला फारच खंत वाटू लागली. तो असा पश्चाताप करीत असता यमुदूतांनी त्याला यमापुढे नेऊन उभे केले.यमाने त्याला पाहून चित्रगुप्ताला त्याचे पापपुण्य विचारले.
|| अधिकमास माहात्म्य अध्याय-२९ समाप्त ||